Supriya Sule-Devendra Fadnavis
Supriya Sule-Devendra FadnavisSaam TV

देवेंद्र फडणवीसांचा यू-टर्न; कृषीपंप वीजबिलाबाबत सत्तेबाहेर आणि सत्तेत असताना वेगळ्या भूमिका, सुप्रिया सुळेंचं ट्वीट

सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीजबिल माफीबाबतच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली.
Published on

मुंबई : महावितरणने अनेक ठिकाणी कृषिपंपांच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. अति पावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीजबिल माफीबाबतच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वीजबिलाबाबत सत्तेत नसताना आणि सत्तेत आल्यानंतरच्या भूमिका कशी वेगळी आहे, हे सुप्रिया सुळेंनी दाखवलं आहे.

Supriya Sule-Devendra Fadnavis
Ajit Pawar : गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रात सुट्टी का? अजित पवार शिंदे सरकारवर संतापले

सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. हा यू टर्न आता चालणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com