Vasai; पैशाचा पाऊस? रस्त्यावर लाखोंच्या नोटांचा खच, पाहा VIDEO Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai: पैशाचा पाऊस? रस्त्यावर लाखोंच्या नोटांचा खच, पाहा VIDEO

मुंबई जवळच असणाऱ्या वसई परिसरात एका चौकात २ हजार रुपयांच्या हजारो नोटा आढळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वसई : मुंबई जवळच असणाऱ्या वसई परिसरात एका चौकात २ हजार रुपयांच्या हजारो नोटा आढळले आहेत. भरचौकात लाखो रुपयांच्या नोटांचा खच बघून अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तसेच बऱ्याच लहान मुलांनी आणि नागरिकांनी या नोटा जमा केले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल Viral video झाले आहे.

हे देखील पहा-

सर्वत्र या घटनेचीच चर्चा सुरू आहे. पण काही वेळानंतर या घटनेबाबत भलतंच सत्य समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी जमा केलेल्या नोटा घटनास्थळी टाकून काढता पाय घेतला आहे. ही घटना वसई मधील मधूबन परिसरात घडली आहे. याठिकाणी २ हजार रुपयांच्या बनावट नोटांचा खच रस्त्यावर पडला होता.

हे दृश्य बघून अनेक लहान मुले आणि काही नागरिकांनी या नोटा जमा केले होते. पण या नोटा एका वेब सिरीजच्या शुटिंगकरिता वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या नोटा बघून अनेकजण चक्रावून गेले होते. भर रस्त्यावर २ हजार रुपयांच्या नोटांचा खच बघून अनेकांनी रस्त्याच्या कडेला आपले वाहन थांबवून पैसे उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पण या नोटा नकली असल्याचे माहिती झाल्यावर, त्यांनी नोटा घटनास्थळी टाकून काढता पाय घेतला आहे. तुम्ही या व्हिडीओ मध्ये बघू शकता, याठिकाणी अनेक लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच काही कर्मचारी हा रस्ता झाडून नोटा गोळा करताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेगाने व्हायरल होतं आहे. नागरिक यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT