Manoj Jarange  Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange : पाणीही न पिणाऱ्या जरांगेंनी खरंच समोसा खाल्ला? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Manoj Jarange samosa viral video : मनोज जरांगे उपोषणावेळी समोसा खात असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय...खरंच जरांगे उपोषणावेळी समोसा खात होते का...? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

मनोज जरांगे उपोषणावेळी समोसा खात असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...या व्हिडिओ उपोषणस्थळी बसून जरांगे समोसा खात असल्याचं दिसतंय...फक्त 9 सेकंदाचाच हा व्हिडिओ आहे...पण, खरंच जरांगे उपोषणावेळी समोसा खात होते का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली.

उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी समोसा खाल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, उपोषणावेळी पाणीही न पिणाऱ्या जरांगेंनी समोसा खाल्ला असा दावा केला जातोय...पण, खरंच जरांगेंनी उपोषणावेळी समोसा खाल्लाय का...? जरांगेंसोबत हजारो आंदोलक मुंबईत आलेयत...त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत असून, काहींनी तर जरांगे समोसा खावून उपोषण करत असल्याचं म्हणतायत...मात्र, आम्ही याची सत्यता सांगण्यासाठी पडताळणी सुरू केली...

या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने थेट आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतली...आणि खरंच व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे की जरांगेंची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय का...? हे जाणून घेतलं...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य काय?

जरांगेंनी उपोषणावेळी समोसा खाल्लेला नाही

चौथ्या दिवसापासून जरांगेंनी पाणीही पिणं सोडलंय

जरांगे समोसा खातानाचा व्हिडिओ AI निर्मित

AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून व्हायरल

मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा डाव

जरांगेंच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आहे...या प्रकारामुळे आंदोलक चांगलेच संतापलेयत...याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत उपोषणावेळी जरांगे समोसा खात असल्याचा दावा असत्य ठरलाय.

आंदोलन मोडीत काढण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आंदोलकांनी संयम बाळगावा, असं आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT