
मनोज जरांगे यांनी आंदोलकांना शिस्त पाळण्याचा इशारा
मनोज जरांगे यांच्याकडून कोर्टाचे आदेश पाळण्याचं भावनिक आवाहन
जरांगेंचा सरकारवर चर्चा न करण्याचा आरोप
मुंबई : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. मराठा आरक्षण आंदोलक रेल्वे स्टेशनवर कब्बडी,खो-खो, लेझीम, दहीहंडी खेळताना दिसत आहे. काही ठिकाणी रस्त्यावर क्रिकेट देखील खेळताना दिसत आहे. आंदोलकांकडून नियमाचं उल्लंघन केल जात असल्याचा कोर्टातही दावा करण्यात आला. आंदोलकांच्या याच वर्तनावर टीका होत आहे. त्यानंतर जरांगेंनी आंदोलकांना दम दिला. माझं ऐकायचं नाही, त्यांनी गावाकडं जावं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आंदोलकांना सुनावलं.
मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी आंदोलकांना भावनिक आवाहन केलं. मनोज जरांगे म्हणाले, 'न्यायदेवता न्याय करतील. माननीय न्यायालयाचं भरभरून कौतुक.. कारण आमचा पण न्याय केला आहे. माझं शेवटचं सांगणं आहे की, रत्स्यावर गाड्या लावू नका. मैदानात झोपा. मैदानात गाड्या लावा. प्रत्येकाने कोर्टाचं ऐकायचं आहे. हे शब्द मला पाणी पिऊन बोलाव लागलं'.
'तुमच्या लेकरं बाळांसाठी एवढे कष्ट घेत आहे. समाजाची मान खाली जाईल, असं मी कधी वागत नाही. तुम्हीही वागू नका. शेवटचं सांगतो की, मुंबईत जेवढ्या गाड्या असतील. तेवढ्या गाड्या मैदानात आणा. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका. मला जर पाणी पिऊन माझ्या समाजासाठी बोलावं लागत असेल तर काय उपयोग माझ्या जीवाला किती त्रास होत असेल, असं ते म्हणाले.
'आंतरवाली सराटीमध्ये हेच माध्यमे आणि पत्रकार होते आणि हेच आंदोलनकर्ते होते. पण पत्रकारांना त्रास झाल्याचं इथंच ऐकायला मिळालं हे सगळं षडयंत्र आहे आहे. कोणाच्या तरी नादी लागून कोणीतरी फुगवून दिलं आहे. आम्हाला सगळं कळतं. जे ऐकत नसतील त्यांनी सरळ परत गावाकडे जावा. संपूर्ण मुंबईतून जेवण मिळत आहे. आम्ही स्वतःची सोय स्वतः करतो. पण आपल्याला कोर्टाचं ऐकायचं आहे. सगळ्यांनी गाड्या मैदानात लावायच्या आहेत. आपल्याला जातीला जिंकवयाचं आहे. मी आरक्षण मिळाल्याशिवाय मैदान सोडणार नाही, असे जरांगे यांनी म्हटलं.
सरकारशी चर्चेला जाणार का, यावर बोलताना म्हटलं की, 'आम्हाला चर्चेला बोलवता, तुम्ही स्वतः चर्चेला का येत नाही. तुमचे पाय मोडले का? तुम्ही १००-१५० मीटरवर आहात. न्यादेवेतेनं काय सांगितलं आणि तुम्ही काय करत आहात. तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे एवढं सगळं झालं आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.