Extra ST Bus On Summer Vacation Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: प्रवाशांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ८० ज्यादा बसेस धावणार

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Extra ST Bus From Pune

दिवाळीनिमित्त एसटीने (ST Bus ) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर (Extra ST Bus From Pune) आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. त्यानुसार लवकरच विभागातील डेपोंमधून ८० जादा बसेस सोडण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

पुणे विभागाने उन्हाळी सुट्टीसाठी एसटी गाड्यांची संख्या वाढवली आहे. दहावी आणि बारावीची पेपर झाल्यामुळे गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांची संख्या अधिक (Extra ST Bus On Summer Vacation) आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुणे विभागातून सातारा, नाशिक , मुंबई , संभाजीनगर या मार्गावर ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

८० ज्यादा बसेस या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. पुणे विभागात बसची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशासनाला नियोजन करणं अवघड जात आहे. त्यामुळे सध्या फक्त ८० ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला (Pune News) आहे. सु्ट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त सुट्ट्यांच्या जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं (Pune To Sambhajinagar Bus) आहे.

एप्रिल महिन्यात बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या (Pune To Satara Bus) लागतात. त्यामुळे पुणे शहरातून मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसचं नियोजन करते. यावर्षीही पुणे विभागाकडून दैनंदिन (Pune To Nashik Bus) गाड्यांशिवाय ८० जादा बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, असं एसटी प्रशासनानं सागितलं आहे.

पुणे विभागातून सातारा, नाशिक , मुंबई , संभाजीनगर या मार्गावर ज्यादा बस सोडण्यात येत आहे. उन्हाळ्यात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या गाड्यांना गर्दी (Pune To Mumbai Bus) असते. प्रवासी संख्येचं योग्य नियोजन करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकरच या बस सुरू होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT