Smart Bus Scam : छत्रपती संभाजीनगरात स्मार्ट बस झिरो तिकीट घोटाळा उघडकीस; 60 कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

Smart Bus zero ticket Scam : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी हाती आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झिरो तिकीट देऊन स्मार्ट सिटी बसमध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Smart Bus Scam
Smart Bus ScamSaam tv
Published On

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजी नगर

Chhatrapati Sambhaji Nagar News :

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी हाती आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झिरो तिकीट देऊन स्मार्ट सिटी बसमध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशासनाने ६० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करत कारवाई केली आहे. तर या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांनी अधिकारी आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

झिरो तिकीट देऊन स्मार्ट सिटी शहर बसमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी आता साठ वाहकांना थेट कामावरून कमी करण्यात आले आहे. कमी करण्यात आलेल्या या वाहकांनी 1008 झिरो तिकीट कापल्याचे प्रशासनाचा आरोप आहे. तर या प्रकरणात वरिष्ठांच्या आशीर्वादानेच तब्बल एक ते सव्वा लाख 0 तिकीट कापून स्मार्ट बसमध्ये लाखोंचा अपहार करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी करत प्रशासनाला उत्तर दिलं आहे.

Smart Bus Scam
Wardha Crime : वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी, पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना निलंबित

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात 2019 पासून 100 बस चालवण्यात येतात. पाच वर्षानंतर ही बससेवा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. मात्र असे असतानाच शहर बसमध्ये स्मार्ट तिकीट घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये एका वाहकाने तब्बल 500 पेक्षा अधिक झिरो तिकीट दिल्याची उघडकीस आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 60 वाहकांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

Smart Bus Scam
Dharashiv Crime News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान, सहायक समाज कल्याण आयुक्तावर गुन्हा दाखल

झिरो तिकीट प्रकरण नेमक काय आहे?

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी प्रशासनाने वाहकांना इलेक्ट्रिक मशीन दिलेले आहे. या दिलेल्या मशीनमध्ये प्रत्येक तिकिटाची नोंद होते. झिरो तिकीट हे शासनाने सूट दिलेल्या तिकिटातून ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना लाभ होतो. मात्र या तिकिटाचा प्रकार अचानक वाढल्याने प्रशासनाला यावर संशयाला आणि प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये 60 वाहकांनी हा गैरप्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com