Pune Crime News, Pune Latest Marathi News
Pune Crime News, Pune Latest Marathi News Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; पोलिसांनी घेतलं एकाला ताब्यात

गोपाल मोटघरे

पुणे - भवानी पेठेत परिसरात काल संध्याकाळी सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये स्फोट झाल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. भवानी पेठेत असणाऱ्या विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह (Pune Police) बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रशाद मोहम्मद अली शेख असे या आरोपाचे नाव आहे. (Pune Latest Marathi News)

हे देखील पाहा -

आरोपी राषद शेख हा पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल आहे. कोंढवा परिसरातील लिशा इनकलेव या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राषद शेख हा आपल्या काही नातेवाईकांसोबत राहत असल्याने त्या ठिकाणी काल रात्रीपासून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

समर्थ पोलीस आणि कोंढवा पोलीस काल रात्री पासून राषद शेख च्या नातेवाईकांकडे कसून चौकशी करत आहेत. त्याचबरोबर कोंढवा येथील राषद शेख च्या घरी कुणालाही जाण्यास कोंडवा पोलीसांनी मज्जाव करण्यात केला आहे. कोंढाणा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारा राषद शेख हा खरंच इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असेल का ? असा एक प्रश्न देखील या स्फोटाच्या घटनेतून उपस्थित होत आहे. याचाच आढावा घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

Special Report : आमदार म्हणताहेत, "खासदार झाल्यासारखं वाटतंय', राज्यात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SCROLL FOR NEXT