Mumbai News Saam digital
मुंबई/पुणे

Excise department employee: ३.५ लाखांचा कर्जाचा बोजा, हप्ते भरता भरता नाकीनऊ; कंत्राटी कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Excise department employee: कर्ज परतफेडीच्या छळाला कंटाळून कर्मचाऱ्यानं केली आत्महत्या, लोकलसमोर उडी घेत संपवलं जीवन; आरोपी ताब्यात.

Bhagyashree Kamble

खासगी सावकाराकडून होणार्‍या छळाला कंटाळून एका व्यक्तीनं मुंबईत लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केलीय. हा धक्कादायक प्रकार जीटीबी नगर रेल्वे स्थानकाजवळ घडला. शाहू सदाशिव माने (वय वर्ष ५७) असं मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृतदेह रविवारी पहाटे जीटीबी नगर रेल्वे रूळावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. शाहू यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शाहू सदाशिव माने, हे महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात कंत्राटी कर्मचारी होते. शाहू हे मुंबईतील सायनच्या प्रतिक्षा नगर येथील रहिवासी होते. शनिवारी रात्री माने उशीरापर्यंत घरी परतले नसल्यानं, चिंतित पत्नीनं त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन उचलला आणि जेटीबी नगर रेल्वे स्थानकावर अपघातात माने जखमी झाले असल्याचं सांगितलं.

माने यांचा २३ वर्षीय मुलगा विनय माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर माने यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या खिशातून माने यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. सायन कोळीवाड्यातील सरदार नगरमध्ये राहणाऱ्या मनीषा देठे (वय वर्ष ४०) यांच्याकडून ३.५ लाख कर्जाचे पैसे घेतले होते. कर्जाचे पैसे मागण्याच्या दबावाखाली माने यांनी जीवन संपवलं असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.

विनय मानेनं दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कोरोनादरम्यान माने यांनी सुरू केलेल्या अन्न आणि दुधाच्या व्यवसायाला तोटा सहन करावा लागला. त्यानंतर ९ टक्के मासिक व्याजदरानं ३१,५०० रूपयांच्या हप्त्यावर त्यांनी देठे यांच्याकडून कर्ज घेतलं. तोट्यामुळं हा व्यवसाय बंद झाला. कर्जाची रक्कम भरण्यास उशीर झाल्यामुळे मनीषा देठे आणि पती सुधीर देठे थेट माने याचं घर गाठायचे. कुटुंबातील सदस्यांसमोर शिवीगाळ करायचे.

नंतर कर्जाची रक्कम ७ लाख रूपये मासिक व्याजदरानं ४९ हजार रूपयांनी वाढली. माने यांना हे कर्ज फेडता येत नव्हतं. त्यांनी इतरांकडून कर्ज घेण्यास सुरूवात केली. देठे यांना ३ लाख कर्जाची रक्कम देण्याइतपत त्यांनी पैसे गोळा केले होते. नंतर माने यांच्या मुलानं एका महिलेकडून २ लाख आणि दुसऱ्या महिलेकडून दीड लाख रूपये घेतले. माने यांनी विद्या चतुर यांच्याकडून ५ लाख रूपये उसने घेऊन देठे यांना दिले.

देठे दाम्पत्यानं मात्र कर्जाची रक्कम वाढल्याचं सांगून माने यांच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केली. देठे दाम्पत्य त्यांना शिवीगाळ करायचे. कर्जाची परतफेड न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली होती. शनिवारी सकाळी देठे दाम्पत्य माने यांच्या घरी गेले. कर्जाची परतफेड होत नाही तोवर घर सोडणार नाही त्यांनी सांगितलं. माने यांच्या पत्नीनं शाहू यांना फोन करून देठे घरी आले असल्याचं त्यांनी सांगितलं. भीतीपोटी माने शनिवारी रात्री घरी परतलेच नाही. त्यांनी लोकल ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती आणि सखोल तपास केल्यानंतर मनीषा देठे, पती सुधीर देठे आणि विद्या चतुर यांच्याविरूद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त, मानसिक त्रास, हेतुपुरस्सर अपमान करणे आणि भारतीय न्याय संहिताच्या कलमांनुसार रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT