Tanaji Sawant Son Update Saam tv
मुंबई/पुणे

Tanaji Sawant Son Update : माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता की अपहरण? ते दोघे कोण? सन्स्पेन्स वाढला

Tanaji Sawant Son rushiraj News : माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाची महत्वाची माहिती हाती आली आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालेलं नाही. तसेच त्यांचा मुलगा परदेशात सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा नाराजीतून मित्रांसोबत परदेशात गेल्याची माहिती हाती आली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा विमानतळावरून बेपत्ता झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, मुलगा परदेशात सुखरुप असल्याचं समजताच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पोलीस आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी घटनाक्रम सांगितला.

पुणे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. माजी मंत्री तानाजी सावंत म्हणाले, 'माझ्या मुलाचं अपहरण झालेलं नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहे. आम्हाला मित्रांविषयी माहिती नाही. ते तिघे जण गेले. फोन न आल्याने मी थोडा काळजीत पडलो. आमचे एकमेकांना दिवसातून पंधरा ते वीस फोन होतात. विमानतळाला अचानक कशाला गेल्याने सगळ्या पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना फोन केले'.

'ते खासगी विमानानं गेले आहेत. आता आम्ही वाट बघतोय, काही माहिती मिळतेय का... ते फ्लाइटमध्ये कसे गेले, ते समजेल. माझ्या चालकाने सांगितलं की, ते विमानतळाला गेले. त्याचे त्याच्यासोबत दोघे मित्र आहेत. त्यांची नावेही माहीत नाहीत. ते नेमकं कोण असल्याचे माहीत नाही. चालकाने सांगितलं की, त्यांना डी १ ला सोडलं आहे. विमान चार्टर आहे की रेग्युलर आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. आमच्यात संवाद असतो. यावेळी अस झालं नाही, त्यामुळे मी घाबरलो. अस्वस्थ झालो, असे त्यांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी सांगितलं की, 'तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंतचं अपहरण झालेलं नाही. तो नाराजीतून मित्रांसोबत गेल्याची माहिती समोर येत आहे. आज रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला ४ वाजता एक माहिती मिळाली की, तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेले. अशी माहिती मिळाल्यानंतर सर्व टीम सक्रिय झाली. त्यानंतर तातडीने याची माहिती घेण्यास सुरु झाली. ते पुण्यावरून विमानाला गेले आहे. ते कोणत्या दिशेने चालले आहे, त्याची खातरजमा केली जात आहे. अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून क्राइम ब्रँचकडे तपास दिला आहे. वेगवेगळ्या यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT