KDMC: Environment Minister Aditya Thackeray in Kalyan today प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

KDMC News: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज कल्याणात; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन आणि भूमीपूजनांचा धडाका

KDMC Election News: डोंबिवलीमधील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले आजी-माजी नगरसेवक शिवसेनेत जाण्याची दाट शकत्या आहे.

प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निवडणुका येत्या काही काळात होऊ घातल्या आहेत. दरम्यान निवडणुकीसाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेची (Shivsena) मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यामुळेच पालिका क्षेत्रात (KDMC) प्रस्तावित विकासकामांच्या भूमीपूजन आणि उद्घाटनाच्या जंगी सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी 5 ते 7 यावेळेत करण्यात आले आहे. (Environment Minister Aditya Thackeray in Kalyan today; Inauguration and Bhumi Pujan on the backdrop of elections)

हे देखील पहा -

भूमीपूजन आणि उद्घाटन हे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच पहिले मराठी आरमार असलेल्या कल्याणच्या दुर्गाडी घाटावर २.५ किमी लांबीच्या नदी किनारा सुशोभिकरण व नौदल संग्रहालयाच्या कामाचे भूमीपूजन, कल्याण पूर्वेतील डायलिसीस सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. दरम्यान मागील काही वर्षांपासून काम सुरु असलेल्या पालिकेच्या स्वा. वी. दा. सावरकर सभागृहाचे लोकापर्ण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यामुळे डोंबिवलीत भाजपने सावरकरांच्या नावाने जे काही राजकारण सुरू केले त्याला शह द्यायचा प्रयत्न शिवसेना करणार आहे, असे बोलले जात आहे.

डोंबिवली मधील आजी - माजी नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता:

डोंबिवलीमधील राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये गेलेले आजी-माजी नगरसेवक शिवसेनेत जाण्याची दाट शकत्या आहे आणि शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी जोरदार तयार केली आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.

Edited By- Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT