ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पानीपुरी हे एक इंडियन लोकप्रिय स्ट्रिट फूड आहे जे जवळपास सर्वांनाच आवडते. पानीपुरीच्या क्रिस्पी पुऱ्या तुम्ही घरच्या घरीसुध्दा बनवू शकता.
पानीपुरीच्या पुरीसाठी पिठ तयार करा, रवा आणि पिठाचे मोजमोप योग्य प्रमाणात घ्यावे.
पिठामध्ये बेकिंग सोडा आणि इनो मिक्स करा. हे टाकल्याने पुऱ्या फुगणयास मदत होते.
पिठाला चांगल्याप्रकारे मळून घ्या आणि मळून झाल्यानंतर कमीत कमी २० मिनिटे पिठाला झाकून ठेवा जेणेकरुन पीठ मुरण्यास आणि सेट होण्यास मदत होईल.
छोट्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्या, लाटून झाल्यानंतर पु-यांना समान आकारामध्ये शेप द्या.
तेल गरम करा आणि पुऱ्यांना मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत तळा. पुऱ्या तळताना त्या दाबा म्हणजे त्या चांगल्या फुलतील.
पुऱ्यांना चांगले थंड होऊदे. पुऱ्या थंड झाल्यानंतर त्या एअरटाइट डब्यात ठेवा म्हणजे त्या चांगल्या क्रिस्पी राहतील.
क्रिस्पी पुऱ्यांमध्ये रगडा, पुदिन्याचे पाणी आणि चटणी टाकून पाणीपुरी खाण्याचा आनंद घ्या.