Nana Patole: कॉंग्रेस हायकमांडचा नाना पटोलेंना दणका; जिल्हा कार्याध्यक्षांंच्या नियुक्त्यांना स्थगिती

Nana Patole Latest News: कॉंग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर नाना पटोले यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
Congress High Command slaps Nana Patole; Postponement of appointment of District Working Presidents
Congress High Command slaps Nana Patole; Postponement of appointment of District Working PresidentsSaam TV
Published On

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी दणका दिला आहे. नाना पटोले यांच्या निर्णयाला पक्षश्रेष्ठींनी स्थगिती देत राज्यातील सर्व जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या स्थगित केल्या आहेत. कॉंग्रेस हायकमांडच्या (Congress High Command) आदेशानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलं आहे. (Congress High Command slaps Nana Patole; Postponement of appointment of District Working Presidents)

हे देखील पहा -

नाना पटोलेंच्या पत्रकात आदेश देण्यात आले आहे की, "महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीने या पूर्वी जिल्हा कमिटीच्या कार्याध्यक्षापदी नेमलेल्या सर्व कार्याध्यक्षांना जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून संबोधण्यात यावे. तसेच या संदर्भात सर्व संबंधितांस आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे व एक पत्र प्रदेश कार्यालयास पाठवावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाना पटोलेंनी केलेल्या सर्व नेमणुकांना हायमकांडने स्थगिती देत पटोलेंना दणका दिला आहे.

याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, "कार्याध्यक्षाच्या जागी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष असा नावात बदल केला आहे, असं म्हणतं त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाना पटोलेंनी केलेल्या नियुक्त्यांच्या निर्णयावर कॉंग्रेस हायकमांडची असलेली नाराजी उघड झाली आहे.

Congress High Command slaps Nana Patole; Postponement of appointment of District Working Presidents
Mohit Kamboj: "शिवसेना भवनासारख्या मंदीरात भXX, दXX, गांXX असे शब्द ठाकरे, सुळे यांना चालतील का?"- मोहित कंबोज यांचा सवाल

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि मग त्यांची महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली गेली होती.

Edited By - Akshay Baisane.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com