सुशांत सावंत, मुंबई
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणांवर, भाजपवर आणि खासकरुन भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका करत अनेक आरोप केले होते. यावेळी सोमय्यांवर टीका करताना त्यांनी सोमय्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करत आक्षेपार्ह शब्दांचा (Offensive words) वापर केला होता, राऊतांच्या (Sanjay Raut) याच वक्तव्यांचा समाचार भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj-Bharatiya) यांनी घेतला आहे. "हिंदुसाठी मंदीरासमान असणाऱ्या शिवसेना भवनात संजय राऊत यांनी वापरलेली भाषा तुम्हाला मान्य आहे का?" असा सवाल भाजप नेते मोहित भारतीय यांनी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना केला आहे. (offensive words are acceptable to Aditya Thackeray and Supriya sule? in holly shivsena Bhavan ask by Mohit Kamboj)
हे देखील पहा -
मोहित कंबोज म्हणाले की, "हिंदुसाठी मंदीरासमान असणाऱ्या शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) संजय राऊत यांनी वापरलेली भाषा तुम्हाला मान्य आहे का? ठाकरे शैली किंवा भाषा ही फक्त आणि फक्त स्वर्गीय श्री हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभत होती. राऊतच्या तोंडातून ठाकरे शैली तुम्हाला मान्य आहे का? संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्या, शब्दप्रयोग या सर्व असंविधानिक वक्तव्याला तुमचा पाठिंबा आहे का? शिवसेना भवनासारख्या मंदीरात भXX, दXX, दXX, गांX हे सगळे शब्द माननीय आदित्य ठाकरे यांना मान्य आहेत का? तुम्ही यावर बोलत नसाल तर राऊतांना तुमचं समर्थन आहे, असं म्हणायच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते राऊत?
शिवसेना नेते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत (press conference) राऊत खूपच आक्रमक झाले होते. भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच त्यांनी भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) उल्लेख "मुलुंडचा दलाल" असा केला. सोबतच त्यांनी किरीट सोमय्यांना आक्षेपार्ह शब्दांतही टीका केली होती.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.