Manasvi Choudhary
व्हेज कोल्हापुरी अत्यंत स्वादिष्ट पदार्थ आहे. बरेचजण ढाबा किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर व्हेज कोल्हापुरी ऑर्डर करतात.
व्हेज कोल्हापुरी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने व्हेज कोल्हापुरी बनवू शकता.
व्हेज कोल्हापुरी घरी बनवण्यासाठी गाजर, बटाटा, कोबी, शेंगा, मटार, कांदा, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, तेल, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा
व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी तुम्हाला मसाला तयार करायचा आहे. यासाठी तुम्हाला सुके खोबरे, खसख, काजू, धने, जिरे, बडीशेप, लवंग, दालचिनी, काळी मिरी, लाल मिरची, हळद हे साहित्य घ्या.
सर्वात व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. गॅसवर एका कढईमध्ये थोडं पाणी आणि मीठ मिक्स करून या भाज्या उकळून घ्या.
एका पॅनमध्ये गरम तेलामध्ये धने, जिरे, बडीशेप, लवंग, दालचिनी, काळी मिरी, लाल मिरची आणि खोबरे हे चांगले परतून घ्या. हे सर्व मसाले करपणार नाही याची काळजी घ्या. या मसाल्यामुळे भाजीला मूळ चव येते.
भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून थंड करा नंतर ते मसाले मिक्सरमध्ये बारीक करा. यात काजू आणि थोडे पाणी मिक्स करा. अशाप्रकारे कोल्हापुरी मसाला तुमचा घरच्याघरी तयार आहे.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये आलं- लसूण पेस्ट चिरलेला कांदा घालून परतून घ्या. कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. नंतर या मिश्रणात टोमॅटो मिक्स करा टोमॅटो शिजल्यानंतर यात तुम्ही कोल्हापुरी मसाला मिक्स करा आणि चांगला परतून घ्या.
यानंतर उकडून घेतलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये मिक्स करा. वरतून मीठ घाला आणि भाजी शिजवून घ्या. अशाप्रकारे तुमची व्हेज कोल्हापुरी तयार होईल. ती तुम्ही राईस, तंदूर रोटीसोबत सर्व्ह करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.