Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंड वातवरणामुळे शरीरावर परिणाम होतो. हिवाळ्यात शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे.
थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो यामुळे त्वचा कोरडी होते, खाज येते व सुरकुत्या पडतात.
हिवाळ्यातील कोरड्या त्वचेपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत ते जाणून घ्या.
हिवाळ्याच्या दिवसात सकाळी अंघोळी केल्यानंतर संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझर लावा ज्यामुळे शरीर कोरडे पडणार नाही.
तुम्ही खोबरेल म्हणून देखील मॉइश्चरायझरचा वापर सहज करू शकता. खोबरेल तेल त्वचेला लावल्याने त्वचा मऊ होते.
कोरड्या त्वचेवर तुम्ही दुधाची साय लावल्यास फायदा होईल. दुधाची साय ही केवळ त्वचा मऊ करत नाही तर नैसर्गिकरित्या त्वचेला मऊपणा आणते.
मध हे देखील त्वचेला लावल्यास त्वचा मऊ होते. तुमचीही त्वचा कोरडी झाली असले तर तुम्ही गुलाब पाणी आणि मध हे दोन्ही त्वचेला लावू शकता.
कोरफड जेल त्वचेला खोलवर हायड्रेशन देते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कोरड्या त्वचेवर कोरफड जेल वापरा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.