Manasvi Choudhary
सर्वांच्याच स्वयंपाकघरात एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे महत्वाचे आहे.
ं
एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये थोडीशीही निष्काळजीपणा केल्यास मोठा अपघात होऊ शकतो.अनेकदा घरामध्ये काम करत असतान गॅसचा वास येतो अशावेळी योग्य पाऊले उचलावीत अन्यथा मोठा परिणाम होतो.
तुम्हालाही घरात एलपीजी गॅसचा वास येत असेल तर काय सावधगिरी बाळगावी हे जाणून घ्या.
घरामध्ये एलपीजी इथाइल मर्केप्टन मिसळले जाते यामुळे गॅस गळती झाल्यास त्याचा वास लगेचच ओळखता येतो. घरातून गॅस गळतीचा वास येत असेल तर वेळीच बर्नर आणि रेग्युलेटर ताबडतोब बंद करा.
घरामध्ये गॅस गळतीचा वास येत असेल तर मेणबत्या, अगरबत्ती आणि दिवे हे ताबडतोब विझवा.गॅस गळती झाल्यास चुकूनही लाईटर किंवा काडीपेटी पेटवू नका.
इलेक्ट्रीकल स्विच चालू किंवा बंद न करण्याची काळजी घ्या कारण अशावेळी ते स्पार्क होऊन मोठा स्फोट घडवू शकतात.
गॅसचा वास येत राहिला तर रेग्युलेटर काढा आणि सिलेंडरवर सेफ्टी कॅप लावा तसेच लहानमुलांची योग्य प्रकारे काळजी घ्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे योग्य माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.