Manasvi Choudhary
निसर्गसौंदर्य लाभलेल्या जावळीच्या जंगलात वासोटा डोंगरावर वासोटा किल्ला आहे.
या डोंगरावर वशिष्ठ ऋषींचा शिष्य राहत होता त्याने गुरूच्या नावावरून वशिष्ठ असं नाव ठेवलं असाव असा इतिहास आहे.
मात्र कालातंराने या किल्ल्याचं नाव वासोटा असं झालं असं म्हटलं जातं.
साताऱ्याच्या घनदाड जंगलात हा किल्ला असल्याने ट्रेकर्सप्रेमी या किल्ल्याला भेट देतात.
किल्ल्यावर पाण्याची टकी, वाड्याचे अवशेष, शिवमंदिर हे सर्वात मोठे आकर्षण आहे.
किल्ल्यावर पोहोचण्यासाठी संपूर्ण दोन ते अडीच तास कालावधी लागतो.
साताऱ्याहून कास पठारमार्गे बामणोली गावातून शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. किल्ल्यावर सफर करण्यापूर्वी योग्य माहितीचा आधार घ्या.