Manasvi Choudhary
उपवासाल खाल्ला जाणारा साबुदाणा चिवडा सर्वांनाच माहित आहे. साबुदाणा चिवडा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता.
साबुदाणा चिवडा घरी बनवण्याची रोसिपी अत्यंत सोपी आहे. साबुदाणा चिव़डा तुम्ही घरी सहज बनवू शकता.
साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी साबुदाणा, तेल, शेंगदाणे, खोबरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, साखर, लाल मसाला हे साहित्य घ्या.
साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ निवडून घ्या. गॅसवर कढईत तेलामध्ये त्यात साबुदाणा घाला म्हणजे ते मस्त फुगतील.
साबुदाणा कुरकुरीत झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घ्या आता त्याच कढईत शेंगदाणे खरपूस होईपर्यत परतून घ्या. नंतर त्यात कापलेले सुके खोबऱ्याचे काप तळून घ्या.
कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि सर्व साबुदाणा मिश्रणात घाला.
एका मोठ्या भांड्यात साबुदाणा आणि तळलेले सर्व मिश्रण एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ, साखर, मसाला हे घाला.
अशाप्रकारे तुमचा कुरकुरीत साबुदाणा चिवडा घरच्या घरी तयार होईल.