entry of heavy vehicles banned on old pune mumbai highway for three days
entry of heavy vehicles banned on old pune mumbai highway for three days  Saam Digital
मुंबई/पुणे

Old Pune Mumbai Highway: बुधवापर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण

दिलीप कांबळे

Maval :

चैत्र यात्रेनिमित्त आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्राधान्य देण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी देखील एकविरा देवीच्या गडावर तसेच पायऱ्या मार्गावर व कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान महामार्गावर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही तसेच येणाऱ्या भाविकांना व पालखी घेऊन येणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने कार्ला गडावर येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra News)

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरा देवीचा चैत्र पालखी सोहळा आज (साेमवार) कार्ला गडावर रंगणार आहे. पालखी मिरवणुकीची व यात्रेची सर्व तयारी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. आई एकवीरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या ठिकाणी आई एकविरेचा भाऊ काळ भैरवनाथ यांचा पालखी मिरवणूक सोहळा पार पडला.

कोकण भागातून येणाऱ्या आई एकवीरा देवीच्या पालख्या या देवघरांमध्ये येऊन काळ भैरवाची भेट घेत त्या ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक काढत कार्ला गडावर दुपार नंतर येणार तर आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणुकीचा सोहळा सायंकाळी सात वाजता कार्ला गडावर होणार आहे.

कार्ला एकविरा देवीच्या माहेर घरात श्री काळभैरवनाथाचा पालखी सोहळा गावात पार पडला. लोणावळ्यातील देवघरात एकविरा देवीचा भाऊ काळ भैरवनाथ यांच्या जत्रेची लगबग दिसून आली. आग्री कोळी, बांधव अनेक वेशभूषा परिधान करून देवघरात दाखल झाले.

यावेळी तळ कोकणातून शेकडो पायी पालख्या भैरवनाथ महाराजांच्या दर्शनाला आई एकविरा देवीच्या माहेरघर येथे आल्या. संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पालखी प्रदक्षिणा पार पडल्यानंतर पालखी मंदिरातच विसावली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज संध्याकाळी कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी ही पालखी येणार आहे. संध्याकाळी एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ व एकविरा देवी या भावा बहिणीची कार्ला गडावर भेट होणार आहे. या काळभैरवनाथाच्या व कार्ला एकविरा देवीच्या पालखी सोहळ्यासाठी आगरी, कोळी बांधव मोठ्या संख्येने कार्ला गडावर येत असतात.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कहर; फळ पिकांसह उन्हाळी पिकांचं मोठे नुकसान

Mumbai Lok Sabha Voting Live : अभिनेते धर्मेंद्र यांनी केलं मतदान

Manoj Jarange Patil यांचं आरोग्य चांगलं राहू द्या, युवकांचा तुळजापूर ते अक्कलकोट पायी प्रवास

Iran Helicopter Crash: इराणच्या राष्ट्रपतींचा शेवटचा VIDEO आला समोर, हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी नेमकं काय झालं?

Iran Helicopter Crash| इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT