कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळेत इंग्लंडच्या धर्तीवर शिक्षण प्रणाली! SaamTvNews
मुंबई/पुणे

कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळेत इंग्लंडच्या धर्तीवर शिक्षण प्रणाली!

रोहिदास गाडगे

पुणे : ग्रामीण आणि डोंगराळ भागातील जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं कि नको रे बाबा असं म्हणण्याचे वेळ येते. याला अपवाद ठरलीय पुण्याच्या (Pune) शिरुर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्डेलवाडी! कोरोना महामारीच्या संकट काळात शाळांचं आणि विद्यार्थ्यांचं नातंच संपलं होतं. मात्र, शिरुर (Shirur) तालुक्यातील कर्डेलवाडीची (Kardelwadi) जिल्हा परिषद शाळा (ZP School) वर्षाचे ३६५ दिवस भरते तेही कोणतीच सुट्टी न घेता.

हे देखील पहा :

या शाळेची दखल एनसीईआरटीच्या (NCERT) सर्वेक्षण विभागाने घेतली असून एनसीईआरटी च्या शैक्षणिक सर्वे विभागाच्या प्रमुख इंद्राणी भादुरी यांनी राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे परवानगी मागितली आहे. कर्डेलवाडीच्या या जिल्हा परिषद शाळेचा एनसीईआरटी अभ्यास करणार आहे. संस्थेचे प्रतिनिधी डॉ. विशाल पजानकर यांच्या नेतृत्वाखालील २५ ते ३० शिक्षण तज्ज्ञांचे पथक महिनाभर या शाळेचा, येथील शैक्षणिक स्थितीचा, उपक्रमांचा अभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे या जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्लंडच्या शिक्षण प्रणालीतुन विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत असल्याने या शाळेचा एनसीईआरटी अभ्यास करणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रणालीत कायम दुर्लक्षित पहायला मिळतात. मात्र, हेही चित्र बदलु शकतं असा संदेश कर्डेलवाडीच्या शाळेने दिलाय. विद्यार्थी फक्त विद्यार्थी न राहता त्याच विद्यार्थ्यांचा ज्ञानार्थी बनला पाहिजे हि संकल्पना घेऊन सकट गुरुजींनी आपल्या पत्नी शिक्षिका यांनी या शाळेने 20 ते 22 वर्षापुर्वी सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांनीच शिक्षकांच्या भुमिका घेत इंग्लंड शिक्षण प्रणाली अवलंबलीय या उपक्रमाची आता देशपातळीवर दखल घेतली जाणार आहे.

शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबर इतरही उपक्रम आणि मोठ्या वर्गांचा अभ्यास या मुलांना दिला जातो आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आज या शाळेतील पहिलीतील विद्यार्थी आठवीचे गणित सोडवतो. हे सर्व क्रियाशील शिक्षकांच्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे. या अशा शाळांच्या वाटचालीमुळे जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. अशावेळी जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात टिकवायचं असेल. तर, असं चांगल्या प्रणालीच्या शिक्षणाचे बाळकडू देण्याची इच्छाशक्ती पुढील काळात प्रत्येक शिक्षकांनी दाखवायला हवी.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मराठी शिक्षण इंग्रजी माध्यमांच्या तोडीसतोड शिक्षण देण्याची किमया कर्डेलवाडी शाळेनं करुन दाखवलीय पाचवी ते सातवीच्या विध्यार्थ्यांचा भविष्याचा पाया आत्ताच भक्कम व्हावा यासाठी जगाच्या पटलावरची शिक्षणप्रणालीत आत्मसात करुन विद्यार्थी कुणावरही अवलंबून न राहता शिक्षणाचे धडे गिरवतात.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT