MPSC च्या मुलाखत यादीत स्वप्नील लोणकरचं नाव; मात्र उपयोग काय?
MPSC च्या मुलाखत यादीत स्वप्नील लोणकरचं नाव; मात्र उपयोग काय? SaamTvNews

MPSC च्या मुलाखत यादीत स्वप्नील लोणकरचं नाव; मात्र उपयोग काय?

2019 MPSC परीक्षेची मुलाखत यादी जाहीर झाली असून त्यात स्वप्नीलचं नाव आलंय, मात्र मुलाखतीसाठी तो नसणार आहे!

पुणे : २०१९ मध्ये म्हणजेच सुमारे दोन वर्षांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) ची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलखात होत नसल्याने व नोकरी मिळत नसल्याच्या ताणतणावातून व आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन पुण्यातील फुरसुंगी येथील गंगानगरमध्ये २९ जून २०२१ रोजी आत्महत्या केली होती. हि घटना घडून आता जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लोटत आला असताना २०१९ च्या MPSC परीक्षेच्या मुलाखत यादीत आता स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे.

हे देखील पहा :

मात्र, परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्याने व नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केली होती. ज्या कारणासाठी त्याने आत्महत्या (Suicide) केली त्या मुलाखतीच्या यादीत त्याचं नाव आलं खरं मात्र मुलाखतीला जाण्यासाठी स्वप्नीलचं नसणार आहे! त्यामुळे ज्या मेहनतीने त्याने या स्पर्धा परीक्षांची तयारी केली, परीक्षा उत्तीर्णही झाला, मात्र मुलाखत होत नसल्याने व नोकरी नसल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नीलचे मुलाखत यादीत नाव येऊनही त्याला व त्याच्या कुटुंबियांना काय फायदा झाला? असा सवाल आता उपस्थित होतोय.

कोरोना महामारीमुळे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अनेकदा पुढे ढकलावी लागली होती. त्यातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड तणाव आणि निराशा पसरल्याचे आपण पाहिले आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील केवळ मुलाखत न झाल्याने नोकरी मिळू शकत नाही, या तणावातूनच स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली होती.

MPSC च्या मुलाखत यादीत स्वप्नील लोणकरचं नाव; मात्र उपयोग काय?
शरद पवार सोनिया बैठक; बैठकीला संजय राऊतही उपस्थित! काय झाली चर्चा? वाचा...

स्वप्नील हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वप्नील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला. राज्य लोकसेवा आयोगाची 2019 ची पूर्व आणि मुख्य परीक्षा स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत त्याच्या आत्महत्येवेळी जवळपास दीड वर्षापासून झालेली नव्हती. याशिवाय स्वप्नील याने 2020 मध्येही राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. ती पूर्व परिक्षाही स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परिक्षा अद्याप झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपुर्वीच्या चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com