नवी दिल्ली : स्वत:चं मत मांडण्यासाठी सोशल मीडिया चांगला पर्याय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा व्यक्ती त्याचं म्हणणं हजारो लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतो. या सोशल मीडियावर अनेक युजर पोस्ट करत असतात, त्या आपल्याशी संबंधित असतात. आपण त्यांना लाइक आणि कमेंट्स करत असतो. अशाच प्रकारे सोशल मीडियावर एक पोस्ट लाइक केल्याने कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागली आहे. एका पोस्टवर लाइक आणि कमेंट्स केल्याने कंपनीने कर्मचाऱ्याला नोकरीवर बडतर्फ केले आहे.
काही कंपनीत कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कंपनी कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाची देखील सोय करण्यात आलेली असते. अनेक लोक सोशल मीडियावर कंपनीच्या चुकीच्या कामाच्या पद्धतीविरोधात आवाज उचलतात. अनेक जण सोशल मीडियावर त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाविषयी भाष्य करत असतात. याच प्रकारची पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवरून समोर आली आहे. याच आशयाच्या पोस्टवर दुसऱ्या एका युजरने लाइक आणि कमेंट्स केली.
एक कर्मचारी त्यांच्या कंपनीच्या कामाच्या पद्धतीविषयी त्रस्त होता. त्यामुळे त्याने थेट सोशल मीडियावर एका युजरच्या कामाविषयी पोस्टवर कमेंट केली. त्या पोस्टमधील कमेंट्समध्ये म्हटलं की, मी एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम सुरु केलं होतं. या कंपनीतील कामाचे नियम फार वेगळे होते. या कंपनीतील कामाच्या पद्धतीमुळे माझं जीवन उद्धवस्त झालं आहे. आम्ही बॉसच्या समोर काही बोलू शकत नव्हतो. आम्ही या गोष्टीमुळे त्रस्त होतो. या त्रासाविषयी पोस्ट लाइक केल्याने दुसऱ्या दिवशी सीईओचा फोन आला, त्यात सीईओने म्हटलं की,आम्ही तुम्हाला कामावरून बडतर्फ केलं आहे'.
पुढे कर्मचाऱ्याने म्हटलं की, 'कंपनीविषयी चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याच्या माझ्यावर आरोप करण्यात आला आहे. ते माझ्या विरोधात कोणतीही एखादी चूक शोधून मला कामावरून काढण्याविषयी प्लान रचत होते'.
कर्मचाऱ्यांच्या म्हणणं आहे की, 'कंपनीतील एखादा व्यक्ती मानसिक छळाविषयी बोलतो, त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मी कामाविषयी सवाल केल्याने माझ्यावर मानसिक दबाव आणला जात आहे. मी आता खूप घाबरलो आहे. मला दुसऱ्या ठिकाणी कामावर जाताना देखील अडचणी आणल्या जाऊ शकतात. मी आता एकच करू शकतो की, गप्प राहून काम करणे आणि त्रास सहन करणे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.