Mumbai Local Train Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: कुर्ल्यातील गर्दी कमी होणार, मध्य रेल्वेचा गेमचेंजर प्रोजेक्ट, हार्बर मार्गाला सर्वाधिक फायदा

Kurla Railway Station : कुर्ला स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे चुनाभट्टी-तिलकनगर दरम्यान उन्नत हार्बर मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा मार्ग 2025 पर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे पनवेल-कुर्ला प्रवास जलद होईल आणि हार्बर मार्गावरील गर्दी कमी होईल.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Harbor Train Update : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून कुर्ला रेल्वे स्थानकाला ओळखलं जाते. जेव्हा पाहावे तेव्हा कुर्ला स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकदा या गर्दीमधून वाट काढत जाणेही कठीण होतं. पण आता ही तोबा गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण चुनाभट्टची आणि तिलकनगर यादरम्यान मध्य रेल्वेकडून कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येत आहे. उन्नत हार्बर मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७० ते ८० टक्के काम पूर्ण झालेय. डिसेंबर २०२५ पर्यंत उन्नत हार्बर मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. उन्नत हार्बर मार्गामुळे कुर्ला स्थानकातील गर्दी नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेकडून चुनाभट्टी ते तिलकनगर यादरम्यान उन्नत मार्ग उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. या उन्नत मार्गाचा फायदा पनवेल-कुर्लादरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना होईल. पाचवी आणि सहावी मार्गिका कुर्लाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत नेण्यासाठी मध्ये रेल्वेसमोर जागेची अडचणी आहे. त्यामुळं चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येतोय.

कुर्ला स्थानकात सध्या दोन अतिरिक्त मार्गिका आहेत, मात्र त्यावरुन मेल, एक्स्प्रेस चालवल्या जातात. त्यामुळं लोकल फेऱ्यावर आणि त्यांच्या वेगावर मर्यादा येते. त्यामुळेच कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक 7-8 जवळ उन्नत मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. याची लांबी 1.1 किमी इतकी असेल. या उन्नत मार्गामुळे कुर्ला स्थानकावरील गर्दी नियंत्रणात येईल. याचा फायदा हार्बर मार्गावरील प्रवाशांना जास्त होईल, असे सांगितले जातेय.

उन्नत मार्गामुळे पनवेल-कुर्ला प्रवास अधिक वेगवान होईल. त्यासाठी हार्बर मार्गावरील दोन फलाट आठ मीटरवर उचलले जाणार आहेत. त्यासाठी तिलकनगर स्थानकापुढे सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येतोय. हा उड्डाणपुल कुर्ला स्थानकातून कसाईवाडा पुलापर्यत उतरेल. येथे एक टर्मिनल फलाटही उभारला जाणार आहे. या उन्नत मार्गामुळे प्रवास अधिक वेगात होईल, असे सांगितले जातेय. या वर्षाअखेरपर्यंत याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT