OBC Reservation
OBC Reservation Saam TV
मुंबई/पुणे

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत; राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची पटोलेंची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत. भाजपप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

याबाबत बोलताना पटोले म्हणाले की, राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) घालवण्यात तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. फडणवीस सरकारने सत्तेत असताना ओबीसींचे गेलेले आरक्षण पुनर्स्थापित व्हावे यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत . हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि आरक्षणाची गुंतागुंत वाढली.

कोर्टाने इम्पिरिकल डेटा (Imperial Data) मागितला परंतु केंद्र सरकारने हा डेटा देण्यास नकार दिला. केंद्रातील भाजपा सरकारने जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारची अडवणूक केली. यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्ष सुरूवातीपासून ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये याच भूमिकेचा आहे व आजही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये हीच भूमिका कायम आहे.

मध्य प्रदेशातही ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाला होता पण, सुप्रीम कोर्टाने त्यांना ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास परवानगी दिली. राज्यातील भाजपा नेत्यांनी मविआ सरकारवर केवळ राजकीय हेतूने आरोप करत आरक्षणाचे खापर फोडले होते. आता भाजपप्रणीत सरकार राज्यात आले आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत तर ओबीसी आरक्षण प्रश्नी मध्यस्थी करून ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्याची विनंती त्यांनी करावी. हा प्रश्न राज्यातील ओबीसी समाजाचा असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचे योग्य ते प्रतिनिधित्व कायम रहावे हे महत्वाचे आहे. राजकीय मतभेद विसरून भाजपा सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

IPL 2024 SRH vs LSG: पुरन-बिदोनीची नाबाद खेळी; हैदराबादच्या संघासमोर १६६ धावांचे आव्हान

Today's Marathi News Live : छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले?

Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT