State Election Commission Saam TV
मुंबई/पुणे

'या' १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; असा असेल कार्यक्रम

राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या (Municipal Elections) तारखा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या (Municipal Elections) तारखा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या तारखेनुसार ही निवडणुक प्रक्रिया १८ ऑगस्टला पार पडणार आहे.

दरम्यान, नगरपालिकांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आयोगाने दिलेल्या प्रभाग रचना, आरक्षण सोडतीयच्या कार्यक्रमानुसार आरक्षणासहित अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. नगरपंचायतच्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देण्यात आला होता. त्यानुसार अंतिम प्रभाग निहाय मतदारांच्या याद्या अधिप्रमाणित करुन त्या प्रसिद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मतदान केंद्राची ९ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. (State Election Commission)

पाहा व्हिडीओ -

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा व आवश्यक असल्यास परिस्थितीनुरुप त्यात बदल करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार आता हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने १७ जिल्ह्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार आता १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका ४ नगरपंचायती सार्वत्रिक सदस्यपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २० तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून २२ ते २८ जुलै दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत. या नामनिर्देशनपत्रांची छाननी २९ जुलैला होणार आहे.

दरम्यान, उमेदवारांना आपले अर्ज माघार घेण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. तसंच या निवडणुकांचे निकाल १८ आणि १९ तारखेला जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगाने सांगितलं आहे.

या १७ जिल्ह्यांमध्ये पार पडणार निवडणुका -

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT