patient death  Saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! हॉस्पिटलमधील आयसीयूत उंदीर चावलेल्या महिलेचा मृत्यू

mira bhayandar hospital women patient death : मिरा-भाईंदरमध्ये मोठी घटना घडली आहे. ICUत उंदीर चावलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पिंपरी चिंचवडमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात घडली धक्कादायक घटना

आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

मनोज तांबे, साम टीव्ही

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. रुग्णालयात उंदीर चावलेल्या रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ८९ वर्षीय महिला रुग्णाच्या मृत्यूने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रुग्णाचे नातेवाईक आणि मनसेने दोषीवर कारवाईची मागणी केली आहे.

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात ८९ वर्षीय सुहासिनी माठेकर यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना १२ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या या वृद्ध महिलेचा आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ४ दिवसांत सुहासिनी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उंदराने चावल्यानंतर ८९ वर्षीय महिला रुग्ण रक्तबंबाळ झाली होती. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला होता. तर मनसेने आक्रमक भूमिका घेत डॉक्टरांना निलंबित करा, अशी मागणी केली आहे. पुढील २४ तासांत डॉक्टर निलंबित झाले नाही, तर भव्य आंदोलन उभारू, अशा इशारा मनसेने दिलाय.

नेमकं काय घडलं?

भाईंद पश्चिमच्या भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयूमध्ये ८९ वर्षीय महिलेला दाखल करण्यात आलं होतं. या महिलेच्या हाताला रात्री उंदराने कुरतडलं. रुग्ण सुहासिनी माठेकर यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. आयसीयूमध्ये सामान्य प्रवेश नसतो, तिथे उंदरांनी उच्छाद मांडल्याचे वास्तव या घटनेने समोर आलं. रुग्णालयाचे नातेवाईक सकाळी ६ वाजता बघायला गेले. त्यानंतर हात कुरतडणारा उंदीर पळून गेला. यावेळी रुग्णालयात रात्री कर्तव्यावरील डॉक्टर आणि नर्सने बघितले नसल्याचे आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मिरा-भाईंदरमधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT