Eknath Shinde Latest News, Shivsena News Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण काढून घेतले; एकनाथ शिंदेंचे खळबळजनक ट्विट

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे, असे ट्विट शिंदे यांनी केले आहे. शिवसेनेच्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे, याकडेही शिंदे यांनी या ट्विटमधून लक्ष वेधले. (Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडामोडींना वेग आला असून, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार सध्या आसाममधील गुवाहाटीतील एका हॉटेलात तळ ठोकून आहेत. शिवसेना आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे आणि गट त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आता दोन्ही बाजूने कायदेशीर लढाई लढण्यावर जोर दिला जात आहे.

शिवसेनेकडून १७ आमदारांच्या निलंबनाची याचिका विधानसभा उपाध्यक्षांकडे दिल्यानंतर घडामोडींना वेग आला असतानाच, अशा प्रकारची याचिका करून तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शिवसैनिक आहोत, असं शिंदे यांनी काल, ठणकावून सांगितलं आहे. तुम्ही कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात? असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असंही शिंदे म्हणाले होते.

दुसरीकडे, राज्यात शिंदे गटानं सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केलेल्या असतानाच, एकनाथ शिंदे यांनी आज, शनिवारी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. 'राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे,' असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि आहे, याकडेही एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

SCROLL FOR NEXT