CM Eknath Shinde- Devendra Fadnavis/Eknath Shinde Twitter SAAM TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde: फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग अन् मुख्यमंत्र्याची वाढली धाकधूक! CM शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर फडणवीसांनी कारचं सारथ्य केलं, त्यांच्यासोबतच्या प्रवासाचा अनुभव CM एकनाथ शिंदेंनी सांगितला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CM Eknath Shinde- Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर उद्या, रविवारी 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्टिअरिंग हातात घेत 500 किलोमीटर स्वतः कार चालवत प्रवास केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या या प्रवासाची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. याच प्रवासाचा अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच शब्दात सांगितला आहे.

समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना मुलाखत दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आगामी राजकीय धोरणांसह अनेक प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली, ज्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या प्रवासाचा भन्नाट किस्साही सांगितला.  (Eknath Shinde)

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

या प्रवासाबद्दल सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "समृद्धी महामार्गावर मी याआधी प्रवास केला आहे. त्यामुळे मला त्याचा अनुभव होता. परंतु त्या दिवशी फडणवीसांचा ड्रायव्हिंगचा मूड होता. ते म्हणाले मी कार चालवतो, तुम्ही बसा. ड्रायव्हिंग न येणारी व्यक्ती बाजूला बसली तर त्याला अजिबात भीती वाटत नाही, परंतु मला ड्रायव्हिंग येते त्यामुळे माझी धाकधूक वाढली होती. पण फडणवीसांनी सफाईदारपणे ड्रायव्हिंग केलं, ते पट्टीचे ड्रायव्हर निघाले." (Maharashtra News)

दरम्यान "समृद्धी महामार्ग फक्त रस्ता नसून यामुळे अनेकांना रोजगार निर्माण होणार आहे. रस्त्याच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क, शेततळी उभारली जात आहेत. त्यात काठोकाठ पाणी असून टेक्सटाईल पार्कही उभारले जाणार आहे. या मार्गामुळे शेतकऱ्यांना माल वाहतूक करण्यास मोठी मदत होणार असल्याचेही मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

Edited By - Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये २५० हून अधिक प्रवासी अडक

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

पनवेलजवळ अपघात, रेल्वे ट्रॅकवरून मालगाडी घसरली, VIDEO

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

SCROLL FOR NEXT