Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मोठा दणका! सहाय्यक आयुक्त तडकाफडकी सस्पेंड, नेमकं झालं काय?

Eknath Shinde suspends Yasin Tadvi : ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त यासीन तडवी यांना कथित हलगर्जीपणाबद्दल ८ दिवसांसाठी निलंबित केले.

Namdeo Kumbhar

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी यांना ८ दिवसांसाठी निलंबित केले आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत शिंदेंनी ही कारवाई केली. मागील पाच दिवसांपासून ठाण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. त्यातच आपत्ती विभागाकडून हवं तसं काम करण्यात आले नाही, त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली.

पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली. ठाणे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आणि सहाय्यक आयुक्त यासीन तडवी यांना तडकाफडकी ८ दिवसांसाठी निलंबित (सस्पेंड) करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नेमकी कारवाई का झाली?

मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना, आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी प्रत्येक ठिकाणी स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. मात्र, अनेक दुर्घटनांच्या ठिकाणी आपत्ती प्रमुख यासीन तडवी हे फिरकलेच नसल्याचे समोर आले. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली असता हा हलगर्जीपणा उघडकीस आला. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यानही तडवी अनुपस्थित असल्याने एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तर गय करणार नाही: एकनाथ शिंदे

आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला. ते म्हणाले, आपत्तीच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. कामात हलगर्जीपणा केल्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांना ८ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच उत्तम आणि कार्यक्षम अधिकारी दिले जातील.

आपत्कालीन परिस्थितीत कामाचा ताण वाढतो, हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेत आऊटसोर्सिंगच्या (Outsourcing) माध्यमातून तातडीने मनुष्यबळाची भरती केली जाईल, असेही शिंदे म्हणाले.

प्रशासनाला कडक सूचना:

उपमुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. ठाणे शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा करणे आणि झाडे पडल्यास ती तातडीने बाजूला करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने निष्काळजीपणा दाखवल्यास थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माओवादी असल्याचा बनाव करणाऱ्या सहा जणांना अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Earthquake: नाशिक- पालघर पुन्हा हादरलं! सुरगाणा,दिंडोरी, कळवण भागातील जमीन थरथरली, वारंवार का येतोय भूकंप?

Palghar Waterfall : पालघरपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' मनमोहक धबधबा, वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट!

Famous Actor Death: बॉलिवूडवर शोककळा! देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ITR Filing : शेवटचे 2 दिवस उरले! फॉर्म 16 मिळाला नाही? तरीही ITR भरता येतो का? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT