Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

Shruti Vilas Kadam

त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो

टॅल्कम पावडर त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि ओलावा शोषून घेऊ शकते. त्यामुळे चेहरा काही काळ मॅट आणि कमी तेलकट दिसतो.

Face Care | Saam Tv

चेहरा तात्पुरता फ्रेश दिसतो

पावडरमुळे त्वचेचा चिकटपणा कमी झाल्याने चेहरा फ्रेश दिसू शकतो. मात्र, हा परिणाम तात्पुरता असतो.

Face Care | Saam tv

ओपन पोर्स होण्याची शक्यता

काही प्रकारच्या पावडरमधील घटक त्वचेवर जमा झाल्यास ओपन पोर्स बंद होऊ शकतात. त्यामुळे पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्सचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

Face Care | Saam tv

त्वचा कोरडी होऊ शकते

रोज चेहऱ्यावर पावडर लावल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. विशेषतः कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

Face Care | Saam tv

खाज किंवा जळजळ होऊ शकते

संवेदनशील त्वचा असल्यास काही सुगंधी किंवा इतर घटकांमुळे लालसरपणा, खाज किंवा जळजळ जाणवू शकते.

Face Care | Saam Tv

मेकअपसाठी वापरताना काळजी घ्या

चेहऱ्यावर पावडर वापरायची असल्यास त्वचेसाठी योग्य आणि नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादन निवडणे फायदेशीर ठरू शकते.

Face Care | Saam tv

रोज वापरण्यापेक्षा त्वचेचा प्रकार लक्षात घ्या

टॅल्कम पावडर चेहऱ्यासाठी आवश्यक नाही. त्वचेच्या गरजेनुसार मॉइश्चरायझर आणि योग्य स्किनकेअर उत्पादने वापरणे अधिक योग्य ठरू शकते.

Face Care | Saam Tv

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा