Shruti Vilas Kadam
कांदा सोलून बारीक वाटा आणि त्याचा रस गाळून घ्या. ताजा कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावा.
कापसाच्या मदतीने कांद्याचा रस थेट केसांच्या मुळांवर आणि स्काल्पवर लावा. बोटांनी काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
कांद्याचा रस लावल्यानंतर साधारण १५ ते ३० मिनिटे केसांवर ठेवू शकता. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
कांद्याच्या रसाचा वापर केसगळती कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून केला जातो. मात्र, याबाबत वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.
कांद्याच्या रसामध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात. त्यामुळे केसांच्या मुळांसाठी तो उपयुक्त ठरू शकतो, असा दावा केला जातो.
सुरुवातीला आठवड्यातून एकदा वापर करून पाहा. त्वचेला त्रास होत नसल्यास वापराची वारंवारता हळूहळू वाढवता येऊ शकते.
कांद्याचा रस काही जणांच्या स्काल्पवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा निर्माण करू शकतो. त्यामुळे वापरण्यापूर्वी छोट्या भागावर पॅच टेस्ट करा.