Shruti Vilas Kadam
डार्क सर्कल्स किंवा थकवा लपवण्यासाठी डोळ्यांखाली हलक्या हाताने कन्सीलर लावा. यामुळे डोळ्यांचा मेकअप अधिक फ्रेश दिसतो.
तुमच्या स्किन टोन आणि आउटफिटला साजेसा आयशॅडो निवडा. न्यूड, ब्राऊन किंवा गोल्डन शेड्स रोजच्या मेकअपसाठी चांगले पर्याय ठरू शकतात.
डोळ्यांचा आकार उठून दिसण्यासाठी आयलायनरचा वापर करा. सुरुवातीला पातळ रेषा काढून नंतर आवश्यकतेनुसार ती जाड करा.
काजळ लावताना डोळ्यांच्या वॉटरलाइनवर हलक्या हाताने वापरा. स्मज्ड काजळामुळेही आकर्षक आणि सॉफ्ट लुक मिळू शकतो.
आयलॅशेसना व्हॉल्यूम आणि लांबी देण्यासाठी मस्कारा वापरा. मस्कारा लावताना ब्रश मुळापासून टोकापर्यंत हलक्या हाताने फिरवा.
आयब्रो पेन्सिल किंवा जेलच्या मदतीने भुवयांना नैसर्गिक आकार द्या. खूप गडद रंग वापरण्याऐवजी केसांच्या रंगाशी मिळता-जुळता शेड निवडा.
झोपण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप पूर्णपणे काढा. विशेषतः मस्कारा आणि आयलायनर साफ करण्यासाठी सौम्य मेकअप रिमूव्हर वापरणे योग्य.