OTT Watch: वीकेंड करा धमाकेदार; घरबसल्या पाहा हे ७ भन्नाट OTT शो, पाहा संपूर्ण यादी

Shruti Vilas Kadam

द रिव्होल्यूशनरीज (The Revolutionaries) – Prime Video

निखिल अडवाणी दिग्दर्शित या ८ भागांच्या सीरिजमध्ये ब्रिटिश राजवटीविरोधात संघर्ष करणाऱ्या तरुण क्रांतिकारकांची कथा दाखवण्यात आली आहे.

OTT Watch

हुंकार: द रोर (Hunkar: The Roar) – JioHotstar

ही क्राइम थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा सीरिज आहे. १७ वर्षीय मीनू रावत एका प्रभावशाली आध्यात्मिक गुरूवर गंभीर आरोप करते आणि त्यानंतर काय घडते हे या कथेत दाखवण्यात आले आहे.

OTT Watch

शक: ट्रस्ट नो वन (Shaque: Trust No One) – Netflix

परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत असलेली ही मिस्ट्री थ्रिलर सीरिज आहे. रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या आईची कथा यात पाहायला मिळते.

OTT Watch

लस्ट स्टोरीज 3 (Lust Stories 3) – Netflix

चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला हा अँथॉलॉजी सिनेमा आहे. विक्रमादित्य मोटवानी, किरण राव, शकुन बत्रा आणि विशाल भारद्वाज यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

OTT Watch

बेबी डू डाई डू (Baby Do Die Do) – Netflix

हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत असलेला हा अॅक्शन थ्रिलर आहे. बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी क्राइमच्या जगात प्रवेश करणाऱ्या बेबीची कथा सिनेमात दाखवली आहे.

OTT Watch

द इंडिया स्टोरी (The India Story) – JioHotstar

मुलीच्या कॅन्सरमुळे झालेल्या मृत्यूनंतर एक वडील वकिलाच्या मदतीने केमिकल बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांविरोधात कायदेशीर लढा देतात, अशी या सिनेमाची कथा आहे.

OTT Watch

कट्टलन (Kattalan) – SonyLIV

हा मल्याळम अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. जंगलात होणारी हत्तींची शिकार आणि हस्तिदंताच्या अवैध तस्करीभोवती सिनेमाची कथा फिरते.

OTT Watch

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा