Eknath Shinde Sulekha Chavan News  Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Eknath Shinde Shivsena Thane News : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद ST प्रमाणपत्र तपासणी समितीच्या आदेशानंतर रद्द करण्यात आले.

Alisha Khedekar

  • ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का

  • प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

  • जानेवारी २०२६ मध्ये सुलेखा चव्हाण या प्रभागातून बिनविरोध निवडून आल्या होत्या

  • ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवले

मुंबई महापालिकेतील उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर आता ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण ऊर्फ सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा महापालिका प्रशासनाने बुधवारी केली. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेवक पद संपुष्टात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुलेखा चव्हाण या प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत तपासणी समितीसमोर प्रक्रिया सुरू होती. समितीच्या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवक पदाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर १६ जून रोजीच्या समितीच्या आदेशाचा आधार घेत महापालिका प्रशासनाने त्यांचे पद रद्द झाल्याची अधिकृत कार्यवाही केली.

या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये १६ जून २०२६ पासूनच प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील नगरसेवक पद रद्द झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेतील उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर आता ठाण्यात शिंदे सेनेच्या नगरसेविकेवरही पद गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर काही महिन्यांतच दोन्ही गटांतील नगरसेवकांच्या प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरणे चर्चेत आली आहेत.

सुलेखा चव्हाण यांची निवड बिनविरोध झाल्याने प्रभाग क्रमांक ५ (अ) मध्ये राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. आता या रिक्त झालेल्या जागेवर पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया काय असेल, तसेच या प्रभागात पुन्हा निवडणूक होणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: “पोलिसांना टीप का देतो?” म्हणत २२ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

EPFO ची मोठी घोषणा! लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी काढता येणार भरघोस रक्कम; पाहा A to Z प्रक्रिया

Congress : माजी IAS अधिकारी आणि अभिनेत्रीचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत केला मोठा दावा

SCROLL FOR NEXT