eknath shinde  Saam tv
मुंबई/पुणे

शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण पोलिसांत पोहोचलं

kalyan news : शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडीस आल्याचे बोलले जात आहे.

Saam Tv

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटात वाद उफाळला

पदाधिकाऱ्यांचा एकमेकांवर गंभीर आरोप

मतदानाच्या हक्कावर घाला घातल्याचा दावा

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला असून, एका व्यक्तीला मारहाण करून पाया पडायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद अधिकच चिघळल्याचं दिसून येत आहे.हा मारहाणीचा व्हिडिओ शिवसेनेच्या गटप्रमुखाचा असल्याचा आरोप करत शाखाप्रमुख प्रवीण लहू म्हात्रे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गटप्रमुख कामगारांना मारहाण करतो, लोकांची आर्थिक फसवणूक करतो. तसेच महिलांकडून पैसे उकळल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणातील आरोपांवर मारहाण करणारा म्हणून उल्लेख करण्यात आलेले गटप्रमुख सुनील जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मतदानाच्या दिवशी शाखाप्रमुख प्रवीण लहू म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्याला शाखेत बोलावून घेतलं. मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली आणि मतदानाचा हक्क बजावू दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकाराबाबत बोलताना सुनील जयस्वाल म्हणाले की, मला जबरदस्तीने बसून ठेवण्यात आलं, मतदान करू दिलं नाही आणि धमकी दिली. त्यामुळे संबंधितांवर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण कल्याण पूर्व परिसरातील नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या मतदारसंघात घडले असून, दोन्ही पदाधिकारी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत.

तत्पूर्वी, कोळशेवाडी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी दाखल करून चौकशी सुरू केली असून, पुढील कारवाई तपासानंतर केली जाणार आहे.या घटनेमुळे कल्याणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, पुढे या प्रकरणात कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: बर्फाळ वादळात विमानाचा भीषण अपघात; टेकऑफ करतानाच कोसळलं विमान, ७ जणांचा मृत्यू

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

सरकार देणार गरिबांना 2 हजार? गरिबांसाठी केंद्र सरकारची नवी योजना?

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

मुंबईत शिंदेसेनेची स्वतंत्र गटनोंदणी? शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको?

SCROLL FOR NEXT