Eknath Shinde
Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

'एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करणारा जन्माला आला नाही'

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : माझ्याकडे चर्चेसाठी लोक पाठवली आणि दुसरीकडे घरावर दगडफेक चर्चा करायची. एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करणारा जन्माला आला नाही. मला मानणारे हजारो लोक आहेत. ही माणसं म्हणजे मधमाशाचं पोळ आहे, दगड मारला तर डसून टाकतील, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला. (Eknath shinde News In Marathi )

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधासभेत भाषण केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'एकीकडे सत्ता, यंत्रणा आणि दुसरीकडे एक कार्यकर्ता तो म्हणजे सैनिक तो फक्त बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि दिघे साहेबांचा. आम्ही मिशन सुरू केले तेव्हा कुणी विचारलं नाही. ज्या दिवशी मतदान होते त्यावेळी मला जी वागणूक मिळाली त्याचे साक्षीदार हे आमदार माझ्यासोबत असलेले आमदार आहेत. सुनील प्रभू यांना माहित आहे, माझं कसं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता'

'मी शिवसैनिक आहे,आता लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. शिवसेना वाचवायला शहीद होईन. आमदारांना सांगितलं होतं चिंता करू नका. तुमची आमदारकी अडचणीत आली तर सांगेन की, हे का झालं, कशासाठी झालं हे शोधायला पाहिजे होतं', असेही शिंदे म्हणाले.

'माझ्याकडे चर्चेसाठी लोक पाठवली आणि दुसरीकडे घरावर दगडफेक चर्चा करायची. एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करणारा जन्माला आला नाही. मला मानणारे हजारो लोक आहेत. ही माणसं म्हणजे मधमाशाचं पोळ आहे. मी शिवसेनेसाठी जीवाचं रान केलं, रक्ताचे पाणी केलं. वयाच्या सतराव्या वर्षी बाळासाहेब विचाराने वेडा झालो. वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. मी दिघे साहेबांनी सांगितलं, वरिष्ठ लोकांना संधी द्या. मला त्यांनी सांगितलं मला शिकवू नको. मला पदाची लालसा केली नाही. लवकर पुढे जायचं विचार केला नाही. मी नगरसेवक झालो,काम केलं. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही', असं देखील शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : शाळा प्रवेशासाठी लाच; मुख्याध्यापकासह शिक्षक ताब्यात

Mother's Day 2024: मुंबईत राहणाऱ्या मुलीनं आपल्या आईला लिहिलेलं हृदयस्पर्शी पत्र!

प्रसिद्ध अभिनेत्याची कोट्यवधींची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये परताव्याच्या नावाखाली लुटलं

Today's Marathi News Live : पुणे पोलिसांकडून तपासाच्या नावाखाली नाहक त्रास; यशोमती ठाकूर यांचा आरोप

Ideal Daughter In Law : आदर्श सुनेच्या अंगी असतात 'हे' गुण; वाचा आणि सासरच्या मंडळींचे मन जिंका

SCROLL FOR NEXT