मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केलं. यावेळी बोलताना अनेक दिग्गज नेत्यांनी भाषणे केली. शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी सुद्धा विधान सभेत भाषण केलं. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. असं गुलाबराव पाटील यांनी भाषणात म्हटलं. (Gulabrao Patil Latest News)
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
विधानसभेत भाषण करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, 'मी 17 वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केलं. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असं वाटलंही नव्हतं. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांकडे पाहून आम्ही संघटनेत आलो. लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता हे साधन समजून काम करावं लागेल असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं'.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, 'आमच्यावर अनेकांनी बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळालं आहे बाळासाहेबांमुळे मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे' अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी करुन दिली. (Enath Shinde Latest News)
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील आमदारांचे आभार मानले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी जोरदार भाषण केलं.अजित पवार यांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये भाषण करत शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढले.
'एकनाथ शिंदे माघार घ्या, तुम्हाला महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल'
'एकनाथ शिंदे साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेनेचा रक्तपात होईल. यामध्ये शिवसैनिक घायाळ होतील. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल' असं भावनिक आवाहन भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना केलं.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.