
भाजपचे बोरिवली उमेदवार पियूष गोयल कोळीवाडा येथे गेले तर नाकाला रुमाल लावून गेले.
जिथे झोपडी आहे तिथेच घर मिळाली पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे.
धारावी अडानी कडे, सर्व जमीन , एअर पोर्ट अदानील
मोदी स्वतःच बोलले अदानी आणि अंबानी बद्दल राहुल गांधी यांना किती पैसे दिले
त्यावेळी तुमच्या हातात देशात सत्ता आहे. Ed CBI आहे ते कुठे बसले होते.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र निर्माण सेनेचे ६ नगरसेवक फोडले होते. मागितले असते तर दिले असते, मात्र फोडून नेले. फोडाफोडीचं राजकारण शरद पवारांपासून सुरू झालं आणि आज महाविकास आघाडीचे नेते फोडाफोडीवरून आरोप करतायेत.
सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप...
तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा धंगेकरांचा आरोप... पोलीस प्रशासना विरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक... सहकारनगर पोलीस ठाण्यातच मांडला ठिया..
आमदार रवींद्र धंगेकर यांचं सहकार नगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन.. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही म्हणत धंगेकरांचं निषेध आंदोलन..
माझे आणि आनंद दिघेंचे आणि मैत्रिपूर्ण संबंध
आनंद दिघेच्या आठवणींना उजाळा
मी स्वप्नात आहे का असं मला फील येत आहे...
आपण सर्व राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला आला आहात... त्यामुळे माझं भाषण ऐकायला कोणाला इंटरेस्ट नाही मला माहिती आहे.....
राज ठाकरे यांचे भाषण मला प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही
मात्र आज मी त्यांचे भाषण प्रत्यक्ष पाहणार आहे ऐकणार आहे...
सर्व गोष्टींचे नियोजन करणारा कार्यकर्ता आज खासदारकीसाठी उभा आहे...
राज ठाकरे यांनी हात ठेवला नसता तर मी उमेदवार नसतो...
धर्मवीर आनंद दिघे आणि राज ठाकरे आणि त्यानंतर माझ्या खांद्यावर ज्यांनी हात ठेवला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... त्यांच्यामुळेच मला खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे...
आमचे हेलिकॉप्टर तपासतात विमानं तपासतात ,आमच्यावर लक्ष ठेवतात. माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे मुख्यमंत्र्यांच्या गाड्या तपासा, ते हॉटेलमध्ये बसतात त्याखोल्या तपासा मग हा काळा पैसा या निवडणुकीत कोणत्या पद्धतीने वापरला जातो ते तुम्हाला कळेल.
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये घेतायत बैठका
गोविंदनगर परिसरातील मनोहर गार्डन लॉन्समध्ये व्यावसायिक, सामाजिक संघटना, शिक्षणसंस्था चालक आणि अन्य प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री साधतायत संवाद
मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि महायुतीचे ईतर स्थानिक नेते उपस्थित
यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील मार्की (बु) येथील दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची घटना घडली. मुच्ची शेत शिवारात शेतकऱ्यांचे शेत असून आभाळ खूप काळेकुट्ट झाल्याने झाडाचा आसरा घेण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या खाली आपले स्वतःच्या मालकीचे बैल बांधले मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली तिथे बांधून असलेल्या बैलावर वीज पडली व ते जागीच ठार झाले.
जेजुरीत पॅरा ग्लायडिंग पत्र्याच्या घरावर कोसळेलं असून पायलट आणि पर्यटक थोडक्यात बचावला आहे. यात आस्था माने ही युवती किरकोळ जखमी झाली आहे. जेजुरीच्या दरेकर वाड्यातील पत्र्याच्या घरावर कोसलेले प्रसंगी घरातील माणसं थोडक्यात बचावली आहेत.
गोदामात असलेल्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला यश आले आहे.
पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुर नेणारे वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले.त्यात वाहनातील 27 मजुर जखमी झाले तर त्यातील 14 मजुरांवर उपचार सुरू आहेत, 2 गंभीर जखमी मजुरांना भंडार्याला हलविण्यात आलं आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव व मानोरा तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू
मागील तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात अधून मधून अवकाळी पाऊस पडत आहे..
या पावसामुळे उकड्यांने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे..
नवापूर तालुक्यातील पानबारा गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी.....
वादळी वाऱ्याने झाडं उडमळून पडली
गावातील वीज पुरवठा खंडित....
पानबारा मोरकरंजा सोनखांब परिसरातील फळबागांचे नुकसान....
पूर्व पट्ट्यात झालेला पावसाने शेतकरी हवालदिल....
वादळी वाऱ्याने कळमनुरी शहरात भले मोठे झाड कोसळले ,थोडक्यात जीवितहानी टळली
हिंगोली च्या कळमनुरी शहरात वादळी वाऱ्याने झाड कोसळल्याची घटना घडली आहे, मुख्य बाजारपेठेत घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित व नुकसान झाल नाही मात्र हे झाड कोसळल्याने बराच वेळ वाहतूक मात्र खोळंबली होती, प्रशासनाने युद्ध पातळीवर कर्तव्य बजावत या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करत रस्त्यावर पडलेले झाड बाजूल केला आहे
राज्यातील विविध जिल्ह्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघासह राज्यातील औरंगाबाद, नंदुरबार, रावेर, जालना, बीड, जळगाव, अहमदनगर आणि शिर्डी या जिल्ह्यांमधील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
अहमदनगर शहरात महायुतीतील दोन पदाधिकाऱ्यांच्या गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये गाड्याचं मोठं नुकसान झालं असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.
दिल्लीतील 2 रुग्णालयांना धमकी
बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणारा आला मेल
मंगोलपुरी आणि बुराडीमधील रुग्णालयांना धमकी आल्याची माहिती
घटनास्थळी पोलिस दाखल
अधिक तपास पोलिसांकडून सुरू
पाहूनचाराला आलेल्या दोघांचा वीज पडून मृत्यू, दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे झाडा खाली उभे असताना पडली वीज
नागपूर जिल्ह्याच्या काटोलमधील कोंढाळीच्या आलागोंदी गावात दुर्दैवी घटना घडलीय.
60 वर्षीय जयदेवराव मनोठे हे बैतुल वरून तर 55 वर्षीय भागवत भोंडवे असं मृतक व्यक्तीच नाव आहेय.
आलागोंदी गावात गोविंद पंचभाई यांच्या शेतात लग्नकार्यापूर्वीच्या जेवणाचा कार्यक्रमात बोलावलं होतं...
गडचिरोली शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर अचानक ट्रक मध्ये आग लागल्याने मोठी खळबळ
दि बर्निंग ट्रॅकचा मोठा अनर्थ टळला
चालत्या ट्रक मध्ये इंजन गरम होऊन इंजनीत आग लागली
ही घटना चालकाच्या लक्षात येताच चालक, वाहक दोघे ट्रक पेट्रोल पंपावर सोडवून खाली उतरले
ट्रक व पेट्रोल पंपाचे अंतर लांब असल्यामुळे बाल बाल बचावले येथील नागरिक
अग्निशामक्याची वाहन आल्यानंतर ट्रक मधील आग विझवण्यात यश
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे सह परिसरातील नागरिकांनी संतापात फोडला टोल नाका..
टोल कर्मचाऱ्याकडून स्थानिकांना अरेरावी केल्याने फोडला टोलनाका..
स्थानिकांनी सर्व लेनवरील टोल कार्यालय फोडले..
टोल नाक्याचे कंप्यूटर, कॅमेरे सह सर्वत्र तोडफोड करुन लोखोंचे नुकसान..
स्थानिक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा होतात वाद..
टोल कर्मचारी आणि स्थानिकांमधे वाद कायम..
टोल नाका फोडतानाचे cctv आले समोर
इंदिरा गांधी यांच्यासारखा नेता हवा
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे नेते हवे
800 नेत्यांना जेलमध्ये ठेवले आहे
अशोक चव्हाण, अजित पवार यांनी संस्थांग नमस्कार केला
माला मराठी येते
काही चुकीचं जाऊ नये म्हणून मी मराठी बोलत नाही
खोट बोला पण रेटून बोला
कॉन्ट्रॅक्ट लेबर घेऊन दलितांना जास्त मिळू नये म्हणून सुरू आहे
देशासाठी काँग्रेसने केले मग कशाला भाजप ला मत देतात
तुम्ही देशाला काय दिल फक्त भांडण
मुगल चे मुसलमान त्यानंतर मंगळसूत्र
देशा च्या बाबतीत बोलत नाही
तुम्ही काय काम केले
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. नांदेड जिल्ह्यातील नांदेड,भोकर,हदगाव,हिमायतनगर, यासह इतर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण कायम होते.सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तुफान बॅटिंग केली.या अवकाळी पावसामुळे केली.आंबा,उन्हाळी ज्वारी, सह फळबाग आणि भाजी पाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांचे पहिले सत्र २० जून पासून सुरू होत आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्या या २१ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान असतील.
साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी १०७ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केलीय.
वडनरे यांनी जिल्हा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. पक्षांतर्गत वादामुळे वडनरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. पक्षात होणाऱ्या कुरघोडीमुळे वडनरे त्रस्त झाले होते. वडनरे यांच्या राजीनाम्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना झटका बसलाय.
अवैधरित्या गर्भनिदान करणाऱ्या केंद्रावर सापळा रचून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केलीय. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका रहिवाश फ्लॅटमध्ये गर्भनिदान चाचणीचा धंदा सुरू होता.
भाजपच्या प्रचार पत्रकात उमेदवार आणि धनुष्यबाणाचा फोटो नाही. नरेश म्हस्केऐवजी संजीव नाईकांचा फोटो लावण्यात आलाय. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.
धुळ्यात काँग्रेसला मोठं खिंडार
काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळेंनी भाजप मध्ये केला प्रवेश
भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला प्रवेश
काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारी नंतर तुषार शेवाळे नाराज होते
उमेदवारी डावलल्यामुळे तुषार शेवाळे यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा दिला होता राजीनामा
आपल्या ईतर कार्यकर्त्यांच्या सोबत भाजपमध्ये शेवाळे यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश
मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान असलेला १३० वर्षे जुना ब्रिटीशकालीन बेलासिस पूल लवकरच पाडला जाणार आहे. याठिकाणी नव्या पुलाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. निवडणुकीनंतर हे पाडकाम होणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्या बीड लोकसभेसाठी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. याचीच तयारी आता अंतिम टप्प्यात असून जिल्हा प्रशासनाच्या नियोजनात ही मतप्रक्रिया पार पडणार आहे. आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मतदानाच्या साहित्याचा वाटप करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चोख तयारी करत निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना केलं आहे..
बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात 41 उमेदवार आहेत. यासाठी बीड जिल्ह्यात 2 हजार 355 मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर यापैकी 1 हजार 177 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाच्या वतीने लावण्यात आले आहेत.
यामध्ये गेवराई -199, माजलगाव -189, बीड -191 ,आष्टी -220 ,केज-207, परळी - 171 असे एकुण 1177 केंद्रावर वेब कास्टींग होणार आहे. विशेष म्हणजे या 2 हजार 355 मतदान केंद्रापैकी 17 मतदान केंद्र हे अतीसंवेदनशील आहेत. यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे..
यामध्ये मुख्य लढत हि महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्यामध्येही तिहेरी लढत होणार आहे. त्यामुळे जनता नेमकी कोणाला कौल देणार ? हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आज भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाले होते. तुळजाभवानी देवीला कुलधर्म कुलाचार करण्यासाठी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरात येत असतात. त्यातच सुट्टीचे दिवस आल्याने भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
पोलिस भरतीची प्रशिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. कुशल पुरुषोत्तम बोरकर (रा.खमारी) असं मृत तरुणाचे नाव आहे. कुशल हा रविवारी सकाळच्या सुमारास रनिंग करण्यासाठी गेला होता.
पळताना घामघूम झाल्याने तो अंघोळ करायला माडगी येथील नदीच्या पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनं खमारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उद्या होत असलेल्या धुळ्यातील सभेवर अवकाळीच संकट आहे. धुळे शहरासह जिल्हाभरात हवामान विभागातर्फे यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज देखील काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी मंत्री अमित शहा यांची धुळ्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेवर आता अवकाळी पावसाच संकट असल्याचं बघावयास मिळत आहे.
या सभेला अवकाळी पावसाचा फटका बसू नये यादृष्टीकोनातून तयारी करण्यात येत आहे. अमित शहा यांच्या सभेला अवकाळीचा फटका बसू नये याची सर्वतोपरी काळजी आयोजकांतर्फे घेतली जात आहे.
लोकसभेच्या महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनिती
भाजपचे संघटन मंत्री बी एल संतोष यांच्या नेतृत्वात आज भाजपच्या महत्त्वाच्या बैठका
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आज सकाळपासून बैठकांचे सत्र
मुंबईतील जागांबाबत आढावा घेतला जाण्याची शक्यता
मुंबईसाठी पदाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सूचना
पुणे पोलिसांकडून तपासाच्या नावाखाली, नाहक त्रास, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे आरोप
पुण्यातील शनिवारवाडा याठिकाणी पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या गाडीची तपासणी केली
पुणे लोकसभा मतदारसंघाची निरीक्षक म्हणुन काम करीत असताना रुटीन चेकअप च्या नावाखाली पोलिसांचे हे प्रकार सुरु असल्याचं सुद्धा ठाकूर म्हणाल्या आहेत
भाजपा कडुन जनतेच्या कोट्यावधी रुपयांच्या अवैध वाटपाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना नाहक त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत, अशी टीका त्यांनी केली
या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया वर शेयर केला आहे
उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह मतदान केंद्रावर पाठवले जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यात १ हजार ४९४ गाव- वस्तीवर ३ हजार ८५ मतदान केंद्र आहेत. त्यात संभाजीनगर लोकसभेचे २ हजार ४० मतदान केंद्र आहेत. आणि जालना लोकसभा मतदार संघाचे १ हजार ४५ मतदान केंद्र आहेत. तर जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार आहेत.
त्यात जालना मतदार संघात १० लाख ६,४८७ तर औरंगाबाद मतदार संघात २० लाख ६१ हजार २२० मतदार आहेत.
पोलिस चार हजारापेक्षा जास्त पोलीस
संभाजीनगर जिल्ह्याला ६१२० मतदान यंत्रे, २०४० कंट्रोल युनिट, २०४० व्हिव्हिपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत ७३४१ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. २४४५ कंट्रोल युनिट व २६४९ व्हिव्हिपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ७४० मनुष्य बळाची गरज असून २० हजार ५२४ कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली.
मावळात गहूंजे गावातील पवना नदीत बुडून युवकाचा मृत्यू. निखिल यादव असं या तरुणाचे नाव असून तो काही मित्रांसोबत पवना नदीत पोहण्यासाठी गेला होता, गेली आठ दिवसांपासून वातावरणात मोठा उकाडा जाणवत होता तर अंगाची लाहीलाई होत होती. अशातच निखिल यादव याने मित्रानं सोबत पोहण्याचा बेत आखला आणि तो त्याच्या आयुष्याचा शेवट ठरला, पवना नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या मुलाचा बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ आणि लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहे..
पाचव्या टप्प्यात असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे.
मुंबई ,ठाणे ,पालघर यासारख्या मतदारसंघात संमिश्र मतदार राहत असल्यामुळे भाजपकडून या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी त्या राज्यातील मुख्यमंत्री यांना प्रचारासाठी रिंगणात उतरवले आहे. भजनलला शर्मा राजस्थान, पुष्टर सिह धामी उत्तराखंड, भुपेंद्र पटेल गुजरात , योगी आदित्यनाथ यूपी, या राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच सोमवारी होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्रवाल मित्र मंडळाच्या वतीने शहरातील चौका चौकामध्ये, रस्त्यावर आणि जिथे गर्दी आहे, त्या ठिकाणी मोठे होर्डिंग्ज हातात घेऊन मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघांकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. आज शिंदे नाशिक दौऱ्यावर जाणार असून ते सायंकाळी व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांसोबत संवाद साधणार आहेत.
नाशिकच्या मनोहर गार्डन येथे शिंदे शिक्षण संस्था चालक क्रीडा आणि अन्य प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. उद्योजकांसोबत बैठक देखील घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उदय सामंत देखील नाशिकमध्ये ठाण मांडून असणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.