Eknath shinde Saam tv
मुंबई/पुणे

‘शिवसेना को हराना मुश्किल नही, नामुमकिन है’; बदलापूरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा कुणाला इशारा?

Eknath shinde News : बदलापुरात एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या कामाचा पाढा वाचला. यावेळी विकासकामाला कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असंही शिंदेंनी सांगितलं.

Vishal Gangurde

बदलापुरात शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर एकनाथ शिंदेंची बदलापुरात सभा

नगरध्यक्ष शिवसेनेचा होईल, असा विश्वास शिंदेंकडून व्यक्त

मयुरेश कडव, साम टीव्ही

शिवसेना को हराना मुश्किल नही, नामुमकिन है, असं सांगत बदलापुरात शिवसेनेचाच नगराध्यक्ष विजयी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच्या सभेत व्यक्त केलाय. विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याकडे दुर्लक्ष करा, आपण टीकेला कामाने उत्तर देऊ असा सल्लाही त्यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना दिलाय.

बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण चांगलंच तापलंय. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. मात्र गुरूवारी झालेला भाजपच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका करणं टाळलं होतं. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनीही विकासकामांचा पाढा वाचत भाजपवर थेट टीका करणं टाळलंय. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचाराचा स्तर खालावला असला तरी वरिष्ठांनी मात्र युती धर्म पाळल्याचं दिसून येतंय.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

मी दिलेल्या पैशांचा प्रत्येक पैशांचा वामन म्हात्रेंकडून वापर

मोठ्या शहराला लाजवेल अशी बदलापुरातील प्रशासकीय इमारत

बदलापूरसाठी पोशीर आणि शिलार धरण बनवणार

मेट्रो 5 आधी बदलापूरला पोहचेल

रेड लाईन-ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लावणार

बदलापूरमधील बदल पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय

विकास काय केला ते त्यांनी सांगावं'

बदलापुरात केलेलं काम बोलणार

बदलापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.

माझ्याकडे नगरविकास खातं आहे.

काही लोकं निधी घेऊन जातात, एकनाथ शिंदेंचं नाव लिहित नाहीत.

सत्ता येते सत्ता जाते, नाव जाता कामा नये.

आरोपांना कामाने उत्तर दिलं म्हणून राज्यात विकास झाला.

बदलापूरमध्ये शिवसेनेचाच आवाज घुमणार

'आमचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत'

खोट्या तक्रारींना थारा देऊ नका, प्रशासनाला आवाहन

'बदलापूरमध्ये विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही'

'लोकं कामाला मत देतात, आरोपांना मत देत नाहीत'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT