Sanjay Raut News Saam Tv
मुंबई/पुणे

परत या आजही चर्चा करायला तयार आहोत; संजय राऊतांची बंडखोर आमदारांना साद

राज्यात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: परत या आजही चर्चा करायला तयार आहोत, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज बंडखोर आमदारांना केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेने आता बंडखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊतही आक्रमक झाले आहेत, पण आज संजय राऊत (Sanjay Raut) काहीसे मवाळ झाल्याचे दिसले. यावेळी त्यांनी 'आजही आम्ही चर्चेला तयार आहोत परत या चर्चा करुया, असे आवाहन केले. (Eknath Shinde Latest News)

काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या भाषणावर टीका होत आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले, गुवाहाटीला बसलेले अस्वस्थ आत्मे हे काहीही आणि कुठल्याही शब्दाचा अर्थ काढतील त्यांचा महाराष्ट्राशी संपर्क तुटल्यामुळे मराठी भाषेशी पण संपर्क तुटलेला दिसत आहे. कालचे दहिसरचे भाषण माझ्याकडे आत्ताही आहे मी तुम्हाला ऐकवतो. इकडे गोहाटीमध्ये आहेत, त्यांचा आत्मा मेला हे जर मी बोललो असेल आणि ते खरं आहे. तुम्ही समजून घेत नाहीत मी बाप काढला त्यांच्यामध्ये मनाला लागणारे असं काय आहे. आत्ताच गुलाबराव पाटील यांचे भाषण ट्विट केले आहे. ते स्वतः बाप बदलण्याची भाषा बोलत आहेत. त्यांनी जे मार्गदर्शन केले आहे. गोवाहाटीमध्ये बसले आहेत, त्यांच्यासाठी मी हे गुलाबराव पाटील यांचे भाषण ट्विट केले आहे.

बाप बदलण्याची भाषा ही गुलाबराव पाटील यांचे आहे, आमची नाही. जे लोक चाळीस वर्ष पक्षामध्ये राहतात त्यांचा आत्मा मेला आहे. दीपक केसरकर आमच्या जवळचे आहेत, उदय सामंत आमच्या जवळचे आहेत. तिकडे जेवढे आहेत, तेवढे सगळे आमच्या जवळचे आहेत. एकनाथ शिंदे हे आमच्या सगळ्यात जवळचे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

कायदेशीर लढाई आहे, आणि स्टेट फाइट लढाई आणि कायद्याची लढाई शरद पवार यांनी सांगितला आहे, तुमच्याकडे बहुमत आहे आमदारांचे बळ आहे तर थांबत आहे कशाला. ५० आमदारांची ताकद आहे तर तुम्ही गुवाहाटीमध्ये का बसले आहात. ते हिमतीचे लोक आहेत ते म्हणून ते हिंमत दाखवून आधी सुरतला गेले गुहाटीला गेले. केंद्रीय सुरक्षा त्यांना संरक्षण देत आहे मग भीती कसली आहे, असंही संजय राऊत म्हणाले. (Eknath Shinde Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT