Eknath Shinde, Devendra Fadnvis
Eknath Shinde, Devendra Fadnvis Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत येऊन एक महिना होऊन गेला पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता ५ ऑगस्टला होणार विस्तार पुन्हा लांबल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या कामांवर परिणाम होत असून, त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde Latest News)

गेल्या महिनाभरापासून गृह, महसूल आणि शहरी विकास मंत्रालयात अनेक कामे पेंडींगवर पडली आहेत. नवीन सरकार स्थापन होऊन ३६ दिवसांहून अधिक दिवस झाले पण तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विस्तार न झाल्याने त्याचा परिणाम आता विभागांवर होत आहे. त्यामुळे मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केले आहेत.

५ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार होणार होता. पण आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. पण तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपच्या कोट्यातील आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर शिंदे यांच्या गटातील सात आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Diet Tips: 'या' ५ पदार्थाचा आहारात करा समावेश; उन्हाळ्यात आजारांपासून राहा दूर

Jalgaon Cyber Crime : व्यापाऱ्याची ६ लाखात फसवणूक; गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष

Juna Furniture Collection : महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची बॉक्स ऑफिसवर कमाल, पहिल्या विकेंडला कमावले कोट्यवधी रुपये

Bihar Accident News : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीवर काळाचा घाला; भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

Stone Pelting In Mihir Kotecha Ralley: भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, मुंबईत वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT