Sanjay Raut: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात पोहोचले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ सुरू असताना आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ सुरू असताना आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.आज या प्रकरणी ईडी वर्षा राऊत यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.

वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Sanjay Raut
संजय राऊत यांच्यानंतर पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले

ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये शुक्रवार,५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले होते. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीने विशेष न्यायालयाकडे राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती, न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात ईडीने ३१ जुलैच्या रात्री संजय राऊत यांना अटक केली होती.

ईडीने १ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले होते, आणि ८ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आठ दिवसांच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती.

Sanjay Raut
TET, आरोग्य आणि म्हाडा भरती घोटाळा प्रकरणात ईडीची एन्ट्री; ED च्या रडारवर कोण?

आज कोठडी संपल्यानंतर ईडीने (ED) संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले आणि संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून झालेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने माहिती दिली. 'आम्हाला काही कागदपत्रे मिळाली आहेत, ज्यामध्ये अनेक खुलासे झाले आहेत. कागदपत्रांवरून मनी लॉड्रिंगची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान आणखी १.१७ कोटीचे प्रकरण समोर आल्याचे ईडीने सांगितले आहे. याअगोदर १.०६ कोटींच्या व्यवहारांचीही माहिती मिळाली होती. बँक खाते तपासल्यानंतर काही अज्ञातांनी वर्षा राऊत यांना पैसे दिल्याचे आढळून आले आहे, असंही ईडीने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com