Eknath Shinde
Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ; एकनाथ शिंदेंची घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: जेव्हा सरकार अल्पमतात असते तेव्हा कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही. शेवटच्या कॅबिनेटमध्ये २०० निर्णय घेतले आहेत. हे निर्णय बेकायदेशीर आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. उद्या आम्ही कॅबिनेट घेऊन आम्ही हे निर्णय रद्द करणार आहे, कारण या निर्णयाला उद्या कोणी चॅलेंज करु शकतो. त्यामुळे हे निर्णय बेकायदेशीर ठरू शकले असते. आम्ही संभाजीनगर या नावाल स्टे दिलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघालेल्या शब्दाला आम्ही स्टे दिलेला नाही. तुम्ही कितीही खोट बोला ते पटणार नाही, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. शिवसेनेच्या नेत्यांचे आघाडीमध्ये खच्चीकरण झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मी पक्ष प्रमुखांना पाचवेळा भेटलो, त्यांचे ऐका अस सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. पक्षाला नूकसान होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना पक्ष चार नंबरला गेला, असं का झाले आहे. खोट्या केसेसला काही कार्यकर्त्यांना सरकारमध्ये असुनही सामोरे जावे लागले आहे, असं का झाले यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

मी एकटा मुख्यमंत्री नाहीतर हे सर्व ५० आमदार मुख्यमंत्री आहेत. मी विधान सभेत केलेले भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकले आहे, ते मला म्हणाले खूप छान भाषण तुम्ही केले. तुमच्या भावना व्यक्त केल्या आहेत, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. हे आमचे स्थिर सरकार आहे. कुणीही हे सरकार पाडणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे खूप नवीन नवीन आहे. आमचे ५० आमदार खूप कलाकार आहेत. विरोधी पक्षांना ते बास आहेत, असंही शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Viral Video: भारत चंद्रावर पोहचलाय, आमची मुले गटारात पडून मरताहेत; पाकिस्तानी संसदेत भारताचं कौतुक

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड शो

नांदेडमध्ये विषबाधा; 55 भाविक नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल

सावधान! Mobile, Laptop च्या अति वापरामुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Hingoli Water Crisis : दुष्काळाची दाहकता वाढली; हिंगोली जिल्ह्यात ५१ तलाव कोरडे ठाक

SCROLL FOR NEXT