Bhagatsinh Koshyari News, Maharashtra Political Crisis, Maharashtra Floor test news  Saam Tv
मुंबई/पुणे

Floor Test: मोठी बातमी! राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवलं

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. उद्याच बुमत सिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Political Crisis news Updates)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार असल्याचे बोलले जात आहे.

आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीतील हॉटेल बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

उद्या सकाळी ११ वाजता बहुमत चाचणी होणार असल्याचे बोलले जात आहे. ३० तारखेला सकाळी विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्याचा दिवस महाराष्ट्रातील सरकारसाठी महत्वाचा दिवस असणार आहे.

'ठाकरे सरकारकडे बहुमत नाही'

देवेंद्र फडणवीस (Devandra Fadnavis) म्हणाले, ' आज आम्ही राज्यपालांना एनडीएद्वारे एक पत्र दिलं आहे. या पत्रामध्ये राज्यातील सध्याची परिस्थिती आहे, ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत त्यानुसार शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर (NCP) आम्हाला सरकारमध्ये राहायचं नाही असं ते आमदार म्हणत आहेत. अशा परिस्थित राज्य सरकाकडे बहूमत नसून त्यांना आपलं बहूमत सिद्ध करायला सांगाव अशी विनंती करणार पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांना दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितंल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप चॅटमध्ये बदल होणार, वापरकर्त्यांना 'हे' नवीन अपडेट मिळणार

Pune Shocking: 'आई-बाबा माफ करा'! ७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी IT इंजिनिअर पियुषची भावनिक चिठ्ठी

Maharashtra Live News Update: भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांच्या गर्दीचा उद्रेक

Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांनो, सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली!

SCROLL FOR NEXT