Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSaam Tv

एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात लावलेले 'ते' बॅनर चर्चेत

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे.
Published on

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. राज्यभरात शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. शिंदे यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरू केली आहे, तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लावण्यात आले आहेत. आज शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी लावण्यात आलेले बॅनर चर्चेत आले आहे. शिवसेना दक्षिण भारतीय विभागाकडून हे लक्षवेधी बॅनर लावले आहे.

या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यावर 'विजयी भव' अस लिहिण्यात आले आहे. शिंदे यांचा बाहुबली रुपातील फोटो यात वापरण्यात आला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या छातीवर धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटोवर दिसत आहे.

Eknath Shinde Latest News
Pune: एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल

राज्यात काही ठिकाणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात बॅनर लावले आहेत, तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लावले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे, त्यामुळे शिवसैनिकांनी राज्यभरात निदर्शने सुरू केली आहेत.

eknath Shinde
eknath Shinde Saam Tv
Eknath Shinde Latest News
नवी मुंबईत लिफ्ट कोसळून ४ मजूरांचा मृत्यू, २ जण जखमी

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल

शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीकरिता वेळोवेळी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील तफावतींबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अतिरिक्त न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अभिजित खेडकर व डॉ. अभिषेक हरिदास यांनी ॲड. समीर शेख यांच्यातर्फे ही तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक सुनावणीनंतर ही तक्रार ठाणे येथील न्यायालयात वर्ग करण्यात येईल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २००९, २०१४ आणि २०१९ साली कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com