Shivaji Park  Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava: शिवाजी पार्कसाठी एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिंदे गटाने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे -

मुंबई: संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) महत्वाचा निर्णय दिला आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला परवानगी दिली.

तर दुसरीकडे या मैदानावर दसरा मेळावा घ्यायची परवानगी मिळावी यासाठी शिंदे गटाने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरी शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली असली तरी ठाकरे गटासमोरील अडचणींमध्ये काही कमी झालेली दिसतं नाहीये.

पाहा व्हिडीओ -

कारण उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत शिंदे गट आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करणार आहे. सोमवारी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात गेलेल्यावर शिंदे गटाला दिलासा मिळणार की उच्च न्यायालयाचा निकाल जैसे थे राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT