Manasvi Choudhary
प्लेन साड्या नेसायला महिलांना आवडतात. प्लेन साड्या साध्या असल्या तरी त्या नेसल्यावर खूपच सुंदर दिसतात.
रोजच्या वापरासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमांसाठी तुम्ही प्लेन साड्यांची निवड करू शकता.
शिफॉनची प्लेन साडी हलकी असते अंगाला फिट बसते ज्यामुळे लूक सडपातळ दिसता. या साड्यामध्ये तुम्ही अनेक रंग निवडू शकता.
जॉर्जेट साडी ही पूर्णपणे प्लेन चमकदार असते यामुळे साडीला वेगळीच चमक येते. रोजच्या वापरासाठी या साडी सुंदर आणि आरामदायी आहेत.
कॉटन सिल्क साडी हा एकदम स्टायलिश साडी प्रकार आहे. तुम्ही या साड्या ऑफिस मिटींगसाठी नेसू शकता.
सॅटिन सिल्क साड्या या कायमच ट्रेडिंग असतात या साड्या प्लेन असल्या तरी त्या चमकदार असतात यामुळे सॅटिन साडी लोकप्रिय आहे.
ऑर्गेन्झा प्लेन साडी ट्रान्सपरंट आणि थोडी फुगीर असते. जर तुम्हाला स्टायलिश आणि युनिक लूक हवा असेल तर तु्म्ही या साड्यांची निवड करू शकता.