Amit Shah Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा? अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक, नेमकं काय घडलं?

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीने आगामी विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. महायुती लवकरच जागावाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान, महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. 'एकनाथ शिंदेंजी आम्ही त्याग केला, तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं होतं. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याग करण्यासाठी सूचीत करणाऱ्यांनी शिवसेनेच्या धाडसी आणि क्रांतीकारक ऐतिहासिक उठावाची जाणीव ठेवावी, असा संतप्त सवाल शिंदे गटाच्या आमदारांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपा संदर्भात बैठक झाली. या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी आमच्या नेत्यांनी त्याग केला आता तुम्ही त्याग करा, असे सूचक विधान केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या वक्तव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा देणारी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात खुलासा करत ही माहिती खोटी असल्याचं स्पष्टं केलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रतिक्रियेमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह धाडसी पाऊल उचलून उठाव केला नसता तर आज भाजप आमदार विरोधी बाकांवरच बसले असते. त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकण्याची पूर्ण तयारी केली होती, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या आमदारांनी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या या षडयंत्रासंदर्भात स्वत: भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही अनेकदा जाहीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या धाडसी उठावाची चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणीव ठेवावी, अशी चर्चा शिंदे गटाच्या आमदारांमध्ये सुरू आहे. विधानसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत. अशा वातावरणात कोणताही वाद नको म्हणून शिंदे गटाचे आमदार कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange - OBC : हिंमत असेल तर 288...; ओबीसी बांधवांचे मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज

Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; नाना पटोले यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Updates: बदलापुरात महानगर गॅसची मुख्य पाईपलाईन फुटली

New Justice Statue In SC: आता न्यायदेवता डोळस होणार! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT