Abdul Sattar Saam Tv
मुंबई/पुणे

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया; TET घोटाळ्याबद्दल म्हणाले...

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील शिंदे फडणवीस (Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पहिल्या टप्प्यातील भाजप आणि शिंदे गटातील १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. (Mla Abdul Sattar Latest News)

टीईटी घोटाळ्यामुळे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार अडचणीत सापडले आहे. पण आज अचानक आरोप असताना सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी लागली. या शपथविधी सोहळ्यात आरोपांमुळे बदनाम झालेले संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना शपथ दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाले अब्दुल सत्तार?

१८ आमदारांबरोबर सत्तार यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर सर्व आरोपांवर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता असती तर आम्हाला अडचण आली असती. शिक्षण उपसंचालकांनी याबाबत खुलासा केला आहे. माझ्या मुलींनी टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे कुठलाही लाभ घेतला नसल्याचे हे पत्र आहे. त्यामुळे या आरोपात सत्यता नाही.असं अब्दुल सत्तार म्हणालेत. (Eknath Shinde Latest News)

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोललो होतो की, या प्रकरणाची चौकशी करा. आमच्या परिवाराने त्याचा काही उपभोग घेतला असेल आणि त्याची तसी कागद असतील तर चौकशी करा. सुप्रीम कोर्टाने सांगितल की, पगार बंद करता येणार नाही पण पगार बंद झाल्या आहेत. या प्रकरणाशी आमचा सुतमाञ पण संबंध नाही. ज्यांनी हा खेळ केला आहे त्यांच्यावर कारवाई करा. असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: कुवत किती, लायकी किती? लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचा मुद्देमाल जप्त

Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

Viral Video: अजबच! बी. एड . करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जलवा, परीक्षेला चक्क हेलिकॉप्टरने गेले

SCROLL FOR NEXT