Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Guwahati Tour: गुवाहाटी दौऱ्याला चार मंत्र्यासह सहाजण गैरहजर, शिंदे गटात नाराजी? चर्चांना उधाण

शिंदे गटातील या नेत्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुटल चर्चा सुरु झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुवाहाटी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपले आमदार आणि खासदार यांच्या कुटुंबासह गुवाहाटी दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं. मात्र या दौऱ्याला चार मंत्री आणि दोन आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील या नेत्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुटल चर्चा सुरु झाल्या आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गुवाहाटीला गेले होते. मात्र आजच्या दौऱ्यात शिंदे गटाच्या या दौऱ्यात मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभुराज देसाई गैरहजर राहिले आहेत. तर मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणेदेखील गुवाहाटीला गेले नाहीत.  (Latest Marathi News)

या नेत्यांच्या गैरहजेरीमुळे चर्चा होणार हे माहिती असल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्हा आमदारांची इच्छा होती गुवाहाटीला जाण्याची, मात्र आज ग्रामीण भागात लग्नाची तिथी होती. त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. तर गुलाबराव पाटील म्हणाले की, निवडणुकीमुळे मी जावू शकलो नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मी नाशिकला आधीच वेळ दिला होता. नाशिक येथे शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता. नाशिकमध्ये अनेक प्रयोग होतात. त्या प्रयोगांचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा, म्हणून मी नाशिकमध्ये होतो.

नेत्यांनी गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी शिंदे गटात नाराजी आहे का? शिंदे गटातील काही आमदार मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सत्तास्थापनेनंतर शिंदे गटाचा हा अत्यंच महत्त्वाचा दौरा मानला जातोय. मुख्यमंत्री स्वत: उपस्थित असताना या नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT